2 करिंथ 1:3-4
2 करिंथ 1:3-4 MACLBSI
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, दयाघन पिता व सर्वप्रकारे सांत्वनकर्ता देव, ह्याचे आपण आभार मानू या. तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो. आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. त्या सांत्वनाने आम्ही संकटग्रस्तांचे सांत्वन करण्यास समर्थ आहोत.