2 तीमथ्य 1
1
शुभेच्छा व आभार
1देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, 2माझे प्रिय लेकरू तीमथ्य ह्याला:
देवपिता व आपला प्रभू ख्रिस्त येशू तुला कृपा, दया व शांती देवो.
3-4मी माझ्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो आणि तुझे अश्रू आठवून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या प्रांजल विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. 5तो विश्वास तुझी आजी लोईस हिच्यामध्ये व तुझी आई युनीके हिच्यामध्येदेखील होता आणि तोच तुझ्यामध्येसुद्धा आहे, अशी माझी धारणा आहे.
आस्था व हिंमत धरावी म्हणून बोध
6मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर; 7कारण देवाने आपल्याला भीतीचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. 8म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. 9त्याने आपल्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने आमंत्रित केले आहे. ही कृपा काळाच्या प्रारंभापूर्वी ख्रिस्त येशूद्वारे आपल्यावर करण्यात आली. 10परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे.
11मला यहुदीतर लोकांसाठी प्रचारक, प्रेषित व शिक्षक म्हणून नेमले आहे. 12ह्याच कारणाकरिता मी दुःखे देखील सोसत आहे, तरीही मला त्याची लाज वाटत नाही कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझ्या स्वाधीन केलेली ठेव न्यायाच्या दिवसासाठी सुरक्षित राखावयास शक्तिमान आहे, अशी माझी धारणा आहे. 13तू स्वतः अनुकरण करावे म्हणून जी सत्यवचने मी तुला शिकविली आहेत, ती दृढ धरून ठेव. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या श्रद्धेत व प्रीतीत टिकून राहा. 14तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ.
15जे आशियात आहेत, ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे. त्यांच्यापैकी फुगल व हर्मगनेस हे आहेत. 16अनेसिफरच्या कुटुंबावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार मला आधार दिला आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची लाज वाटली नाही, 17तर तो रोम शहरात आल्यावर त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला. 18न्यायाच्या दिवशी त्याला प्रभूकडून दया मिळो! इफिस येथे किती तरी प्रकारे त्याने माझी सेवा केली, हे तुला चांगले माहीत आहे.
Currently Selected:
2 तीमथ्य 1: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: