YouVersion Logo
Search Icon

3 योहान 1

1
1प्रिय गायस, तुझ्यावर खरी प्रीती करणारा, वडीलजनांपैकी एक तुला हे पत्र लिहीत आहे.
2प्रिय मित्रा, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे सर्व बाबतीत तुझे चांगले चालावे व तुला आरोग्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो. 3तू नेहमी सत्याने चालतोस म्हणून तू सत्याशी निष्ठावंत आहेस, अशी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, तेव्हा मला अत्यानंद झाला. 4माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
5प्रिय मित्रा, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. 6त्यांनी ख्रिस्तमंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी येथे साक्ष दिली आहे. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना पुढची वाटचाल करण्यास साहाय्य कर. 7कारण ते यहुदीतर लोकांपासून काहीच न घेता ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी बाहेर पडले आहेत. 8म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यासाठी करीत असलेल्या त्यांच्या सेवाकार्यात त्यांचे सहकारी होऊ.
9मी ख्रिस्तमंडळीला छोटेसे पत्र लिहिले परंतु ख्रिस्तमंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष देत नाही. 10ह्यामुळे जर मी आलो तर तो जी कृत्ये करतो, त्याकडे लक्ष वेधीन. तो आम्हांला त्रासदायक होतील अशा मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो. तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो करू देत नाही व ख्रिस्तमंडळीतून बाहेर घालवून देतो.
11प्रिय मित्रा, वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवाला आवडतो; वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.
12देमेत्रियविषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे, हे तुला ठाऊक आहे.
13मला पुष्कळ लिहावयाचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही. 14मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू.
15तुला शांती लाभो. मित्रमंडळी तुला शुभेच्छा पाठवीत आहे. आपल्या सर्व मित्रमंडळीला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा कळव.

Currently Selected:

3 योहान 1: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in