प्रेषितांचे कार्य 22
22
यहुदी लोकांपुढे पौलाने केलेले भाषण
1“बंधुजनहो व वडीलजनांनो, मी आता तुमच्यासमोर माझी बाजू मांडत आहे.” 2तो आपणाबरोबर हिब्रू भाषेत बोलत आहे, हे ऐकून ते अधिक शांत झाले. तो पुढे म्हणाला,
3“मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकिया येथील तार्स नगरात झाला आणि मी ह्या यरुशलेम शहरात गमलिएलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे काटेकोर शिक्षण मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. 4पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला. 5त्याविषयी उच्च याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्याकडून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्क ह्या ठिकाणी चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेममध्ये शासन करावयास आणावे.
6जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा दुपारच्या वेळेस माझ्याभोवती एकाएकी प्रखर प्रकाश आकाशांतून चमकला. 7मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. 8मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ 9माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. 10मी म्हणालो, ‘प्रभो, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्क येथे जा, तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, ते सर्व तुला तेथे सांगण्यात येईल.’ 11त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले म्हणून माझ्या सहकाऱ्यांनी माझा हात धरून मला दिमिष्क येथे नेले.
12हनन्या नावाचा एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. 13तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणी मी त्याच्याकडे वर पाहिले. 14तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे, हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान सेवकाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी. 15कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षीदार होशील. 16तर आता उशीर का करतोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’
17मी यरुशलेमला परत आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता मला दृष्टान्त घडला. 18तेव्हा मी प्रभूला पाहिले, तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेममधून लवकर निघून जा कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’ 19मी म्हणालो, ‘प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी तुरुंगात टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करत असे. 20स्तेफन जेव्हा तुझा रक्तसाक्षी झाला, तेव्हा स्वतः मी जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळीत होतो.’ 21तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’”
रोमन नागरिक म्हणून पौलाचा हक्क
22ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले, त्यानंतर ते ओरडून म्हणाले, “ह्याची वाट लावा, ह्याची जगण्याची लायकी नाही!” 23ते ओेरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता 24सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते, हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. 25परंतु त्यांनी त्याला बांधावयास सुरुवात केली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रोमन अधिकाऱ्याला पौलाने विचारले, “ज्या रोमन नागरिकाला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
26हे ऐकून रोमन अधिकाऱ्याने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमन आहे.” 27तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
28सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”
29ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले, शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले, तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
न्यायसभेपुढे पौलाचे आत्मसमर्थन
30यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप ठेवला होता, तो काय आहे, हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने पौलाला बेड्यांतून मोकळे केले आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला तेथे आणून त्यांच्यापुढे उभे केले.
Currently Selected:
प्रेषितांचे कार्य 22: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: