कलस्सैकरांना 2
2
1तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी मला प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम करीत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. 2ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रीतीने एकमेकांना ते जोडले जावेत, ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाच्या, म्हणजे पित्याच्या व ख्रिस्ताच्या रहस्याचे, पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. 3परमेश्वराच्या सुज्ञतेचा व ज्ञानाचा सर्व गुप्त खजिना स्वतः ख्रिस्तामध्ये दडलेला आहे.
ख्रिस्ताशी संयुक्त होणे
4लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून मी हे तुम्हांला सांगतो. जरी मी देहाने दूर असलो, 5तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे आणि तुम्हांला ख्रिस्तावरील श्रद्धेमध्ये खंबीर स्थैर्याने एकत्र उभे असलेले पाहून मला आनंद होतो.
6ज्याअर्थी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे त्याअर्थी तुम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करा. 7त्याच्यामध्ये रुजलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर कृतज्ञता व्यक्त करणारे व्हा.
खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा
8ख्रिस्ताकडून नव्हे तर मानवी परंपरांकडून व विश्वावर सत्ता चालविणाऱ्या आत्म्यांकडून येणाऱ्या मानवी शहाणपणाच्या निरर्थक भूलथापांनी तुम्हांला कोणी गुलामगिरीत टाकू नये म्हणून सावध राहा; 9कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते 10आणि त्याच्यामध्ये तुम्हांला परिपूर्ण जीवन देण्यात आले आहे. तो सर्व आध्यात्मिक सत्ता व अधिकार यांचा प्रमुख आहे.
11ख्रिस्तामध्ये तुमची सुंतादेखील झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर दैहिक पापी स्वभावापासून तुमची मुक्तता केल्याने ख्रिस्ताकडून झाली आहे. 12तुमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या सामर्थ्यशाली कृतीवरील विश्वासाद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात. 13तुम्ही एके काळी आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेला होता. त्याने आपल्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करून आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले. 14आपल्याविरुद्ध असलेली ऋणपत्रिका त्याने खोडली व त्याच्या क्रुसावर चढवून त्याने ती पूर्णपणे रद्द केली 15आणि त्या क्रुसावर ख्रिस्ताने स्वतःला सत्ताधीशांपासून व अधिकाऱ्यांपासून मुक्त केले. त्याच्या जयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना बंदिवान म्हणून घेऊन जाताना त्याने त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.
16तर मग खाण्यापिण्याविषयी, किंवा सण, किंवा नवचंद्रोत्सव किंवा साबाथ पाळण्याविषयी कोणाला तुमच्यासाठी नियम करू देऊ नका. 17ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची केवळ छाया आहेत; ख्रिस्त हेच वास्तव आहे. 18आपल्याला झालेल्या खास दृष्टान्तामुळे जो खोट्या नम्रतेचा व देवदूतांच्या उपासनेचा आग्रह धरीत असतो अशा माणसाला तुम्हांला दोषी ठरवू देऊ नका. असा मनुष्य विनाकारण मानवी विचारसरणीने गर्वाने फुगलेला असतो. 19शरीराचे मस्तक असलेल्या ख्रिस्ताला त्याने सोडून दिलेले असते. ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सर्व शरीर सांधे व मज्जा यांच्यायोगे दृढ जोडले जाते व त्याची ईश्वरी इच्छेनुसार वाढ होत जाते.
20तुम्ही ख्रिस्ताबरोबर मृत झाला आहात व विश्वाच्या सत्ताधिकारी आत्म्यांपासून तुमची मुक्तता करण्यात आली आहे. तर मग तुम्ही या जगाचे विधिनियम पाळत अशा प्रकारे जीवन का जगता? 21-22म्हणजे, उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी ‘हात लावू नकोस, चाखू नकोस व दुसऱ्याला स्पर्श करू नकोस’ अशा प्रकारच्या माणसांच्या नियमांचे व शिकवणुकीचे तुम्ही पालन का करता? 23जी दिखाऊ सुज्ञता बळजबरीने केलेली देवदूतांची उपासना, खोटी नम्रता व देहदंडन यांच्यामधून व्यक्त होते त्या सुज्ञतेवर असे नियम आधारित असतात. परंतु देहस्वभावाच्या वासनेला प्रतिबंध करण्याची क्षमता त्यांच्यात नसते.
Currently Selected:
कलस्सैकरांना 2: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: