इब्री 10
10
ख्रिस्ताचा आत्मयज्ञ इतर यज्ञमार्ग रद्द करतो
1तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून नियमशास्र प्रतिवर्षी अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी देवाजवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. 2ते समर्थ असते, तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापांची जाणीव नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? 3परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे पापांचे स्मरण होत आहे; 4कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
5परिणामत: जगात येताना ख्रिस्त देवाला म्हणाला,
यज्ञ व अर्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती,
तू माझ्यासाठी शरीर तयार केले;
6वेदीवर संपूर्ण प्राणी जाळल्याने व
पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष होत
नव्हता.
7ह्यावरून मी म्हणालो, पाहा, हे देवा,
ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे,
तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.
8वर उल्लेखिल्याप्रमाणे तो प्रथम म्हणाला, ‘यज्ञ, अर्पणे, होमार्पणे व पापांबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष होत नव्हता’; (नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण करण्यात येतात ती ही); 9आणि मग तो म्हणाला, ‘पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे’. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. 10त्या देवाच्या इच्छेनुसार आपण येशू ख्रिस्ताने एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.
11पापे दूर करायला जे यज्ञ कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ प्रत्येक यहुदी याजक प्रतिदिवशी सेवा करीत वारंवार अर्पण करीत उभा असतो; 12परंतु पापांबद्दल शाश्वत असा एकच यज्ञ अर्पण करून येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे 13आणि तेव्हापासून त्याचे वैरी त्याचे पादासन होईपर्यंत तो वाट पाहत आहे. 14म्हणजेच पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाकरिता परिपूर्ण केले आहे.
15पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो:
16परमेश्वर म्हणतो,
त्या दिवसानंतर जो करार
मी त्यांच्याबरोबर करीन तो हा:
मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन,
ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.
17त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार
मी ह्यापुढे मुळीच लक्षात ठेवणार नाही.
18तर मग ज्याअर्थी त्यांना क्षमा झाली त्याअर्थी त्यांच्या पापांबद्दल अर्पण नाही.
उत्तेजन व इशारा
19-20म्हणून, बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व शाश्वत जीवनाकडे नेणारा मार्ग आपल्यासाठी स्थापन केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे. 21आपल्याकरिता देवाच्या मंदिराचा प्रमुख असा एक थोर याजक देण्यात आलेला आहे; 22म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ. 23आपण न डळमळता आपल्याला मिळालेली आशा जाहीर करून दृढ बाळगू या; कारण ज्याने वचन दिले, तो विश्वासू आहे. 24आपण प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या. 25आपल्यापैकी अनेक लोक करीत आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र येत राहून प्रभूचा दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते, तसतसा एकमेकांना अधिक बोध करावा;
26कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले, तर ह्यापुढे पापांबद्दल यज्ञ होणार नाही; 27न्यायाची आणि विरोधकांना गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची भीतीच उरेल. 28मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला, तर त्याला क्षमा न होता दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. 29तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, ज्यामुळे तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठोर दंडास पात्र ठरेल? 30‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, आणखी, ‘परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील’, असे कोणी म्हटले हे आपल्याला माहीत आहे. 31जिवंत परमेश्वराच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.
धैर्य सोडू नये म्हणून बोध
32पूर्वीचे दिवस आठवा; त्या वेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने विजयी सामना केला. 33कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा उपहास झाला; तर कधी कधी अशी दशा झालेल्यांबद्दल तुम्ही सहानुभूती दाखविली. 34बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली स्वर्गीय मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे जाणून तुम्ही आपल्या ऐहिक मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. 35म्हणून आपला आत्मविश्वास सोडू नका, त्याचे फळ मोठे आहे. 36तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनांनुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हांला सहनशक्तीची आवश्यकता आहे. 37कारण धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे,
अगदी थोडा वेळ राहिला आहे;
जो येणार आहे, तो येईल,
उशीर करणार नाही;
38माझे नीतिमान लोक विश्वासाने जगतील;
जर कोणी माघार घेईल,
तर त्याच्याविषयी
माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.
39ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; उलट, आत्म्याच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आपण आहोत.
Currently Selected:
इब्री 10: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: