इब्री 2
2
महान तारणकार्य
1ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाही तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. 2आपल्या पूर्वजांकरिता देवदूतांद्वारे सांगितलेले वचन जर खरे ठरले आणि प्रत्येक उ्रंघनाची व आज्ञाभंगाची यथान्याय्य शिक्षा मिळाली, 3तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्या सर्वांना प्रमाण पटविले; 4त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुत कृत्ये व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची वरदाने वाटून साक्ष दिली.
5आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. 6उलट, पवित्र शास्त्रात कोणी एकाने साक्ष दिली आहे:
मानव तो काय की,
तू त्याची आठवण ठेवावी?
अथवा मानवपुत्र तो काय की,
तू त्याची काळजी घ्यावी?
7तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे;
तू त्याला वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केले आहे
आणि तू तुझ्या हाताच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे.
8‘तू सर्व काही त्याच्या अधीन - त्याच्या पायांखाली - ठेवले आहे’, सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही; परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. 9देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा अल्पावधीसाठी कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. 10ज्याने सर्व काही निर्माण केले व जो सर्व काही अस्तित्वात टिकवून ठेवतो त्या परमेश्वराने पुष्कळ पुत्रांना त्याच्या वैभवात सहभागी करून घेताना त्यांच्या तारणाचा अग्रेसर येशूला दुःखसहनाच्याद्वारे परिपूर्ण केले, हे देवाच्या दृष्टीने उचितच झाले.
11जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकाच पित्यापासून आहेत, ह्या कारणामुळे त्यांना बंधू म्हणावयाची येशूला लाज वाटत नाही. 12तो परमेश्वराला म्हणतो,
मी माझ्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती जाहीर करीन,
त्यांच्या मेळाव्यात तुझे स्तवन करीन.
13आणि पुन्हा तो म्हणतो,
मी परमेश्वरावर भरवसा ठेवीन.
तसेच तो पुढे म्हणतो,
पाहा, देवाने मला दिलेल्या मुलांसह
मी येथे हजर आहे.
14ज्याअर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही सर्व बाबतीत त्यांच्यासारखा झाला; हेतू हा की, मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला त्याने स्वत:च्या मरणाने नेस्तनाबूद करावे 15आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्यात होते, त्या सर्वांना मुक्त करावे. 16कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्याला नव्हे तर पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे अब्राहामच्या संतानाच्या साहाय्याला धावून येतो. 17म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी विश्वसनीय व दयाळू प्रमुख याजक व्हावे. 18ज्याअर्थी त्याने स्वतः कसोटीशी सामना करताना दुःख भोगले, त्याअर्थी ज्यांची कसोटी होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.
Currently Selected:
इब्री 2: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: