इब्री 4
4
1ज्या विसाव्याविषयी देव बोलला, त्याच्याविषयीचे अभिवचन त्याने आपल्याला देऊन ठेवलेले आहे; कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण काळजी घेऊ या; 2कारण त्यांच्यासारखे आपल्यालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्यांनी ते श्रद्धेने स्वीकारले नाही. 3मात्र आपण श्रद्धावंत लोक परमेश्वराने वचन दिलेल्या विसाव्यात प्रवेश करीत आहोत. हे त्याच्या शब्दाप्रमाणेच घडत आहे:
मी माझ्या क्रोधाने शपथ वाहून म्हणालो,
हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.
जरी जगाच्या निर्मितीनंतर त्याचे कार्य पूर्ण झाले होते, तरीही तो हे म्हणाला. 4सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे,
सातव्या दिवशी देवाने आपल्या
सर्व कृत्यांपासून विसावा घेतला.
5आणि पुन्हा याचविषयी म्हटले आहे,

6ज्यांना पूर्वी शुभवर्तमान सांगण्यात आले होते ते अवज्ञेमुळे त्या विसाव्याच्या ठिकाणी आले नाहीत; इतरांना मात्र तेथे पोहोचता येण्यासारखे आहे. 7म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्याद्वारे म्हणतो,
आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
तर आपली मने कठीण करू नका.
8जर यहोशवाने त्यांना विसावा दिला असता, तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाविषयी तो बोलला नसता. 9मात्र देवाच्या लोकांसाठी साबाथाचा विसावा राहिला आहे. 10कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात येतो, तो जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला, तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतो. 11म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अविश्वासाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्यापैकी कोणी अपयशी ठरू नये.
12वास्तविक देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा धारदार असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचा न्याय करणारे असे आहे; 13त्याच्या दृष्टीला अदृश्य काहीच नाही, ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे, असे सृष्टीतील सर्व काही त्याच्या दृष्टीला उघड व प्रकट केलेले आहे आणि आपणा सर्वांना स्वतःविषयी त्याला हिशोब द्यावा लागणार आहे.
प्रभू येशू सर्वश्रेष्ठ याजक
14तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला देण्यात आलेला आहे, म्हणून आपण जी श्रद्धा स्वीकारली आहे ती दृढ धरून राहू या. 15आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. 16तर मग आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्या वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.
Currently Selected:
इब्री 4: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: