रोमकरांना 15
15
सशक्त व अशक्त
1आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. 2आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. 3ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर ‘तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. 4जे काही धर्मशास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपल्या प्रबोधनासाठी लिहिले, त्याकडून धर्मशास्त्रातून मिळणारा धीर व उत्तेजन यांच्या साहाय्याने आपण आशा बाळगावी. 5धीर व उत्तेजन देणारा देव ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे म्हणून तुम्हांला सक्षम करो. 6त्यामुळे तुम्ही सर्व मिळून एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर ह्याचा गौरव करावा.
यहुदीतरांसाठी शुभवर्तमान
7जसा ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा देवाच्या गौरवाकरिता स्वीकार करा; 8कारण मी तुम्हांला सांगतो, परमेश्वर एकनिष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी व पूर्वजांस दिलेली अभिवचने पूर्ण करण्यासाठी ख्रिस्त यहुदी लोकांचा सेवक झाला. 9तसेच यहुदीतरांनीदेखील देवाच्या दयेबद्दल त्याचा गौरव करावा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे:
यहुदीतरांमध्ये मी तुझे स्तवन करीन
व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.
10यहुदीतरांनो,
त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा!
धर्मशास्त्रात असे पुन्हा म्हटले आहे:
11सर्व यहुदीतरांनो,
परमेश्वराचे स्तवन करा,
सर्व लोक त्याचे स्तवन करोत,
धर्मशास्त्रात असेही म्हटले आहे:
12आणखी यशया पुन्हा म्हणतो,
‘इशायाचा वंशज उदयास येईल,
तो यहुदीतरांवर अधिकार चालविण्याकरिता येईल,
यहुदीतर त्याची आशा बाळगतील.’
13आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.
पौलाने सविस्तरपणे लिहिण्याचे कारण
14बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःची खातरी झाली आहे. 15परंतु मला देवापासून प्राप्त झालेल्या संधीमुळे मी तुम्हांला आठवण देऊन काहीशा धैर्याने लिहिले आहे. 16ती संधी अशी की, मी यहुदीतरांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. देवाचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी एखाद्या याजकाप्रमाणे मी सेवा करतो अशासाठी की, यहुदीतरांनी पवित्र आत्म्याने पवित्र होऊन आपणास समर्पित करावे. 17म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सेवेचा मी अभिमान बाळगू शकतो. 18-19यहुदीतरांनी आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या साहाय्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले, ते ते तुम्हांला सांगण्याचे धाडस मी करतो. अशा प्रकारे यरुशलेमपासून इल्लूरिकमपर्यंत मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान पूर्णपणे घोषित केले आहे. 20दुसऱ्यांनी घातलेल्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नव्हे, तर
21त्याच्याविषयी ज्या लोकांना
कोणी सांगितले नाही ते पाहतील,
ज्यांनी त्याच्याविषयी ऐकले नाही
ते समजतील,
ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे शुभवर्तमान सांगण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती.
पौलाचे पुढील बेत
22ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला. 23परंतु आता ह्या प्रांतात माझे कार्य संपले असल्यामुळे आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा असल्यामुळे, 24मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन. तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने मन काहीसे तृप्त झाल्यावर तुम्ही मला तिथे जायला साहाय्य कराल, अशी मी आशा धरतो. 25सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेम येथे जात आहे; 26कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे. 27हा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. परंतु वस्तुतः त्यांना मदत करणे त्यांचे कर्तव्य होते; कारण जर यहुदीतर त्यांच्या आध्यात्मिक आशीर्वादात सहभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. 28हे काम पूर्ण करून त्यांच्यासाठी जमा केलेला संपूर्ण निधी त्यांच्या पदरात टाकून झाला की, तुमच्याकडील मार्गाने मी स्पेन देशास जाईन. 29जेव्हा मी तुमच्याकडे येईन, तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन, हे मला ठाऊक आहे.
प्रार्थना करण्याची विनंती
30बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याद्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की, माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर कळकळीने प्रार्थना करा. 31ह्यासाठी की, यहुदीयात जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी मी जे सेवाकार्य करतो, ते पवित्र जनांना मान्य व्हावे. 32म्हणजे मी परमेश्वराच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्या सहवासात ताजातवाना होईन. 33शांतिदाता परमेश्वर तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.
Currently Selected:
रोमकरांना 15: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: