रोमकरांना 16:25-27
रोमकरांना 16:25-27 MACLBSI
आपण देवाचा गौरव करू या. तुम्हांला तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास तो समर्थ आहे. येशू ख्रिस्ताविषयीचे जे शुभवर्तमान मी घोषित करतो त्यानुसार व जे रहस्य गत युगात गुप्त ठेवलेले होते, परंतु आता जे प्रकट करण्यात आले आहे त्यानुसार तो हे करीत आहे. हे सत्य संदेष्ट्यांच्या लेखनाद्वारे उघड करण्यात आले आहे आणि सनातन देवाच्या आज्ञेने ते सर्व राष्ट्रांतील लोकांना कळविण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवावा व आज्ञापालन करावे. एकमेव ज्ञानी देवाचा येशू ख्रिस्ताद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.