YouVersion Logo
Search Icon

योहान 13

13
येशु शिष्यसना पाय धुवस
1वल्हांडण सणना पहिले, या जगमाईन पिताकडे जावानी आपली येळ येल शे हाई येशुनी समजी लिधं, अनी या जगमातील आपलासवर त्यानं प्रेम व्हतं ते त्यानी शेवटपावत करं.
2येशु अनी त्याना शिष्य संध्याकायनं जेवण करी राहिंता तवय शिमोनना पोऱ्या यहुदा इस्कर्योत याना मनमा त्याले धरी देवानं अस सैताननी पहिलेच घाली देयल व्हतं 3तवय आपला हातमा पितानी सर्वकाही देयल शे, आपण देवकडतीन वनु अनी देवकडे जाई राहीनु, 4हाई वळखीसन जेवण करतांना येशु जेवणवरतीन ऊठना, त्यानी आपला कपडा काढी ठेवात अनी रूमाल लिसन कंबरले गुंडाळी लिधा. 5मंग तो एक भांडामा पाणी लिसन शिष्यसना पाय धवु लागना, अनी कंबरले गुंडाळेल रूमालघाई ते पुसू लागना. 6तो शिमोन पेत्रकडे वना, तवय तो त्याले बोलना, “प्रभुजी, तुम्हीन मना पाय धुतस का?”
7येशुनी उत्तर दिधं, “मी करस ते तुले आत्ते कळाव नही, ते पुढे कळी.”
8पेत्र त्याले बोलना, “तुम्हीन कधीच मना पाय धुवाले नको!” येशुनी त्याले उत्तर दिधं, “मी तुना पाय जर नही धुवात तर मनासंगे तुले वाटा नही.”
9शिमोन पेत्र त्याले बोलना, “प्रभुजी, मना फक्त पायच धुवू नका, तर हात अनी डोकं बी धुवा.”
10येशुनी त्याले सांगं, “ज्यानं आंग धोवायेल शे त्याले पायशिवाय काहीच धुवानी गरज नही, तो पुरा शुध्द शे, अनी तुम्हीन शुध्द शेतस, तरी सर्वाजन नही.” 11कारण आपले धरी देणार माणुस त्याले माहीत व्हता, यावरतीन तो बोलना, “तुम्हीन सर्वाच शुध्द नही.”
12 # लूक २२:२७ मंग त्यासना पाय धुवानंतर, आपला कपडा घालीसन येशु बसना अनी त्यानी त्यासले सांगं, “मी तुमले काय करं हाई तुमले समजनं का? 13तुम्हीन माले गुरू अनं प्रभु अस म्हणतस, ते बराबर म्हणतस, कारण मी तसाच शे. 14यामुये जो मी तुमना प्रभु अनं गुरू, तुमना पाय धुवात तर तुम्हीन एकमेकसना पाय धुवालेच पाहिजे. 15हाऊ मी तुमले एक कित्ता घाली देयल शे, जसं मी तुमले करं तसं तुम्हीन कराले पाहिजे. 16#मत्तय १०:२४; लूक ६:४०; योहान १५:२०मी तुमले खरंखरं सांगस दास आपला धनीपेक्षा थोर नही, अनी जो धाडेल तो धाडणारापेक्षा थोर नही. 17या गोष्टी तुमले माहीत शेतस अनी जर त्यानामायक तुम्हीन चालशात, तर तुम्हीन धन्य शेतस. 18मी तुमना सर्वासबद्दल बोली नही राहीनु, ज्या मी निवाडेल शे त्या माले माहीत शे तरी ‘जो मनी भाकर खास त्यानी मनावर आपली टाच उचलेल शे’ असा जो शास्त्रलेख शे तो पुरा व्हयेल शे. 19हाई मी तुमले आते म्हणजे हाई व्हवाना पहिले सांगस, यानाकरता की जवय हाई व्हई तवय तुम्हीन ईश्वास धराले पाहिजे की ‘मी तो शे.’ 20#मत्तय १०:४०; मार्क ९:३७; लूक ९:४८; १०:१६मी तुमले खरंखरं सांगस की मी धाडस त्याना जो स्विकार करस तो मना स्विकार करस, अनी जो माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडं, त्याले स्विकारस.”
आपला ईश्वासघात करनाराले येशु दखाडस
(मत्तय २६:२०-२५; मार्क १४:१७-२१; लूक २२:२१-२३)
21अस बोलानंतर येशु आत्मातीन व्याकुळ व्हयना अनं बोलना, “मी तुमले खरंखरं सांगस, तुमनामधला एकजण माले धरी देवाव शे.”
22तो कोणबद्दल बोली राहीना हाई शंकातीन शिष्य एकमेकसकडे दखु लागनात. 23तवय ज्यानावर येशुनी प्रिती व्हती असा त्याना शिष्यसमाधला एकजण येशुना जोडेच बठेल व्हता. 24तो शिमोन पेत्र इशारा करीसन बोलना, “तो ज्यानाबद्दल बोली राहिना तो कोण शे हाई आमले सांग.”
25तवय तो तसाच येशुना जोडे असतांना मांगे फिरीन त्याले बोलना, “प्रभुजी तो कोण शे?”
26येशुनी उत्तर दिधं, “ज्याले मी घास बुचकाळीसन दिसु तोच तो शे.” मंग त्यानी घास बुचकाळीसन शिमोन इस्कर्योतना पोऱ्या यहुदा इस्कर्योत याले दिधा. 27मंग घास देवावर सैतान त्यानामा घुसना, मंग येशुनी त्याले सांगं, “जे तु कराव शे ते लवकर कर!” 28त्यानी त्याले अस का बरं सांग हाई जेवणले बठेलसपैकी कोणलेच समजनं नही. 29यहुदाजोडे पैसाना थैली व्हती, यामुये सणकरता आपले काही लेनं व्हई ते ईकत लेवाकरता किंवा गरीबसले काही देनं व्हई म्हणीसन येशुनी त्याले सांग व्हई, अस बराच जणसले वाटनं.
30मंग घास लेताच तो लगेच बाहेर गया, तवय रातनी येळ व्हती.
नवी आज्ञा
31तो बाहेर जावानंतर येशुनी सांगं, आते मनुष्यना पोऱ्यानं गौरव व्हयेल शे अनी त्यानामा देवनं गौरव व्हयेल शे. 32जर देवनं गौरव त्यानाकडतीन प्रकट व्हयेल शे, तर देव बी आपलाकडतीन त्यानं गौरव प्रकट करी अनी लवकर करी. 33#योहान ७:३४अहो पोऱ्यासवन, मी आखो थोडा येळ तुमनासंगे शे, तुम्हीन मना शोध करशात अनी जसं मी यहूदी अधिकारीसले सांगं की, जठे मी जासु तठे तुमनाघाई येवावनार नही, तसच मी तुमले बी सांगस, 34#योहान १५:१२,१७; १ योहान ३:२३; २ योहान १:५अनी मी तुमले नवी आज्ञा देस की; तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी. 35तुमनी एकमेकसवर प्रिती राहीनी म्हणजे त्यावरतीन सर्व वळखतीन की, तुम्हीन मना शिष्य शेतस.
पेत्र माले नकारी हाई येशु पहिलेच सांगस
(मत्तय २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; लूक २२:३१-३४)
36शिमोन पेत्र त्याले बोलना, “प्रभुजी, तुम्हीन कोठे जाई राहीनात?” येशुनी उत्तर दिधं, “जठे मी जास तठे आते तुनाघाई मनामांगे येवावनार नही; तरी यानानंतर येशी.”
37पेत्र त्याले बोलना, “प्रभुजी, मनाघाई तुमना मांगे आत्तेच का बरं येवावनार नही? मी तुमनाकरता मना जीव दिसु!”
38येशुनी त्याले उत्तर दिधं, “काय, मनाकरता तु तुना जीव देशी? मी तुले खरंखरं सांगस, तु माले तीनदाव नकारस नही तोपावत कोंबडा कोकावणार नही.”

Currently Selected:

योहान 13: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in