YouVersion Logo
Search Icon

योहान 4

4
येशु अनी शोमरोनी बाई
1येशु योहानपेक्षा जास्त शिष्य बनाडीन त्यासना बाप्तिस्मा करी राहीना हाई परूशी लोकसना कानवर जायेल शे. 2तरी, येशु स्वतः बाप्तिस्मा नही करे; तर त्याना शिष्य करेत. 3अस जवय येशुले समजनं, तवय तो यहूदीया सोडीन परत गालीलले निंघी गया; 4अनी त्याले शोमरोनमातीन जानं पडनं.
5मंग तो शोमरोन प्रांतमातील सुखार नावना गावले वना तो, याकोबनी आपला पोऱ्या योसेफले देयल वावरजोडे व्हता. 6तठे याकोबनी विहिर व्हती, येशु चालता चालता थकना अनं तसाच तो विहिरजोडे जाईन बसना. त्या येळले जवळपास बारा वाजेल व्हतात.
7तठे एक शोमरोनी बाई पाणी भराले वनी, येशु तिले बोलना, “माले पेवाले पाणी दे.” 8त्याना शिष्य जेवण ईकत लेवाले गावमा जायेल व्हतात.
9तवय ती शोमरोनी बाई त्याले बोलनी, “तु यहूदी राहिसन अनी मी शोमरोनी तरी बी तु मनाकडे कशा काय पाणी मांगी राहीना?” कारण यहूदी शोमरोनीससंगे कोणताच प्रकारना व्यवहार करेत नही.
10येशुनी तिले उत्तर दिधं, “जर तु देवनं दान म्हणजे काय अनी तो कोण शे जो तुले सांगी राहिना, माले पेवाले पाणी दे, हाई तुले कळतं तर तु त्यानाकडे मांगती, अनं तो तुले जिवननं पाणी देता.” 11ती बाई त्याले बोलनी, “गुरजी, तुमना जोडे पाणी काढाले बादली नही शे, अनी विहिर खोल शे, मंग ते जिवत पाणी तुमना जोडे कोठेन? 12आमना पुर्वज याकोब यानी हाई विहिर आमले देयल शे; तो स्वतः, त्याना पोऱ्या अनी त्याना गुरढोरं हाई विहिरनं पाणी पेयेत, त्यानापेक्षा तुम्हीन मोठा शेतस का?” 13येशुनी तिला उत्तर दिधं, “जो कोणी हाई पाणी पी! त्याले परत तहान लागी, 14पण मी दिसु ते पाणी जो कोणी पी त्याले परत कधीच तहान लागाव नही, जे पाणी मी त्याले दिसु, ते त्यामा सार्वकालिक जिवनकरता उसळनारा जिवत पाणीना झरा असा व्हई.”
15ती बाई त्याले बोलनी, “गुरजी, माले तहान लागाले नको अनं माले पाणी काढाकरता आठपावत येनं पडाले नको, म्हणीन ते पाणी माले द्या.”
16येशु तिले बोलना, “तु जाईन तुना नवराले बलाव अनी ईकडे ये.”
17ती बाई बोलनी, “माले नवरा नही.” येशु तिले बोलना, “माले नवरा नही हाई तु बराबर बोलनी, 18कारण तुले पाच नवरा व्हतात अनी आते जो शे तो तुना नवरा नही शे, हाई तु खरं सांगं.” 19ती बाई त्याले बोलनी, “गुरजी, तुम्हीन संदेष्टा शेतस हाई माले आते समजनं. 20आमना शोमरोनी पुर्वजसंनी याच डोंगरवर देवनी भक्ती करी अनी तुम्हीन यहूदी म्हणतस, देवनी भक्ती ज्या जागावर कराले पाहिजे ती जागा यरूशलेममा शे.”
21येशु तिले बोलना, “बाई, तुम्हीन देवबापनी भक्ती या डोंगरवर अनी यरूशलेममा बी करावुत नहीत अशी येळ ई राहीनी, हाई मनं खरं मानी ले.” 22तुम्हीन शोमरोनीसले माहीत नही असानी भक्ती तुम्हीन करतस; आमले यहूदीसले माहीत शे असानीच भक्ती आम्हीन करतस, कारण यहूदी लोकसमातीनच तारण शे. 23तरी खरा भक्ती करनारा लोके आत्मातीन अनं खरापणतीन देवबापनी भक्ती करतीन अशी येळ ई राहिनी कदाचित येलच शे, कारण आपली भक्ती करनारा असा पाहिजेत अशी देवबापनी ईच्छा शे.
24“देव आत्मा शे अनी त्याना भक्तसनी त्यानी भक्ती आत्मातीन अनं खरापणतीन कराले पाहिजे.”
25ती बाई त्याले बोलनी, “मसीहा म्हणजे ज्याले ख्रिस्त म्हणतस तो येणार शे हाई माले माहित शे, तो येवावर आमले सर्व गोष्टी सांगी.”
26येशु तिले बोलना, “जो तुनासंगे बोली राहीना तो मीच शे.”
27इतलामा त्याना शिष्य वनात अनी तो एक बाईसंगे बोली राहिना यानं त्यासले आश्चर्य वाटनं. तरी बी तिले कोणीच हाई नही ईचार की, तुले काय पाहिजे किंवा तुम्हीन तिनासंगे का बर बोली राहिना.
28ती बाई आपलं मडकं टाकीन, गावमा परत जाईन लोकसले सांगाले लागनी, 29“या चला, त्या माणुसले दखा, ज्यानी मनाबद्दल सर्व सांगं जे मी करेल व्हतं. हाऊच तर ख्रिस्त नही?” 30तवय त्या गावमातीन निंघीसन येशुकडे गयात. 31त्याच येळले शिष्यसनी त्याले ईनंती करी की, “गुरजी, काहीतरी खाई ल्या!”
32पण तो त्यासले बोलणा, “तुमले माहीत नही अस जेवण मनाजोडे खावाले शे.” 33यावरतीन शिष्य एकमेकसले बोलनात, “कोणी तरी त्यानाकरता जेवण तर नही लई वना ना?”
34येशु त्यासले बोलना, “ज्यानी माले धाडेल शे त्याना ईच्छाप्रमाणे करानं अनी त्यानी माले कार्य पुरं करानं हाईच मनं जेवण शे.” 35“चार महीना बाकी शेतस मंग कापणी ई” अस तुम्हीन म्हणतस की नही? दखा, मी तुमले सांगस, आपला डोया वर करीसन वावरे दखा; त्या कापणीकरता पिकी जायेल शेतस! 36कापणाराले आते मजुरी भेटी राहीनी अनं सार्वकालिक जिवनकरता पीक गोया करी राहीना; यानाकरता की पेरणारानी अनं कापणारानी बी संगे आनंद कराले पाहिजे. 37“एक पेरस अनं एक कापस” अशी जी म्हण शे आठे ती खरी ठरस. 38ज्यानाकरता तुम्हीन कष्ट करं नही ते कापाले मी तुमले धाडसु; दुसरासनी कष्ट करेल शे अनं त्यासना कष्टना तुम्हीन भागीदारी व्हयेल शेतस.
39“मी करेल सर्व त्यानी माले सांगं,” अशी साक्ष देनारी ती बाईना बोलनावरतीन त्या गावमधला बराच शोमरोनी लोकसनी येशुवर ईश्वास ठेवा. 40अनी म्हणीन शोमरोनी त्यानाकडे वनात तवय त्यासनी त्याले, तुम्हीन आमना आठे मुक्काम करा, अशी ईनंती करी, अनी येशु तठे दोन दिन राहीना.
41त्याना वचनंसवरतीन आखो कितलातरी लोकसनी ईश्वास धरा, 42अनी त्या ती बाईले बोलनात, “आते तुना बोलणावरतीनच आम्हीन ईश्वास धरतस, कारण आम्हीन स्वतः ऐकी लिधं अनी आम्हीन समजी जायेल शेतस की, हाऊ खरच जगना तारणारा शे.”
येशु एक अधिकारीना पोऱ्याले बरं करस
43मंग त्या दोन दिन नंतर येशु तठेन निंघीन गालीलमा गया. 44#मत्तय १३:५७; मार्क ६:४; लूक ४:२४कारण येशुनी स्वतः साक्ष दिधी की, “संदेष्टाले स्वतःना देशमा मान भेटस नही.” 45#योहान २:२३जवय तो गालीलमा वना, तवय गालीलकरसनी त्यानं स्वागत करं, कारण यरूशलेममा सणना येळले जे काही त्यानी करं ते सर्व त्यासनी दखेल व्हतं अनी त्या बी सणले जायेल व्हतात.
46 # योहान २:१-११ मंग येशु गालीलमातीन काना गावले परत वना, तठे त्यानी पाणीना द्राक्षरस करेल व्हता. तठे राजाना एक अधिकारी व्हता, त्याना पोऱ्या कफर्णहुम गावमा आजारी व्हता. 47जवय येशु यहूदीयातीन गालीलले येल शे अस त्या अधिकारीनी ऐकं तवय तो त्यानाकडे गया, अनी तुम्हीन कफर्णहुमले ईसन मना पोऱ्याले बरं करा अशी त्यानी त्याले ईनंती करी, कारण तो मराले टेकेल व्हता. 48त्यावर येशुनी त्याले सांगं, “तुम्हीन चिन्ह अनं चमत्कार दखाशिवाय ईश्वास ठेवश्यातच नही.”
49तो अधिकारी त्याले बोलना, “गुरजी, मना पोऱ्या मराना पहिले मनासंगे चला.”
50येशुनी त्याले सांगं, “जा; तुना पोऱ्या वाचेल शे!”
तो माणुस येशुना शब्दसवर ईश्वास ठेईन निंघी गया. 51तो जातांना त्याना दास त्याले भेटीन बोलना, “तुना पोऱ्या वाची जायेल शे!”
52त्यानी त्याले ईचारं त्याले कोणती येळले बरं वाटाले लागनं, त्यानी त्याले सांगं, कालदिन एक वाजाले त्याले बरं वाटाले लागनं. 53तवय त्याना बाप समजी गया की जी येळले येशुनी सांगेल व्हतं की, “तुना पोऱ्या वाचेल शे,” त्याच येळले हाई व्हईनं मंग त्यानी अनी त्याना सर्व घरानानी ईश्वास ठेवा.
54येशुनी यहूदीया मातीन गालीलमा येवावर परत जो दुसरा चमत्कार करा तो हाऊच.

Currently Selected:

योहान 4: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in