YouVersion Logo
Search Icon

मार्क 3

3
येशु लुळा हातना माणुसले बरं करस
(मत्तय १२:९-१४; लूक ६:६-११)
1परत येशु सभास्थानमा गया, तठे लुळा हातना एक माणुस व्हता. 2तो शब्बाथ दिन व्हता येशु त्या माणुसले बरं करस की काय करस; हाई दखाकरता काही लोके टपेल व्हतात. म्हणजे त्यानावर आरोप करानी संधी त्यासले भेटी असा त्यासना बेत व्हता. 3येशुनी त्या लुळा हातना माणुसले सांगं “ऊठ, मजारमा उभा ऱ्हाय.”
4मंग त्यानी त्या लोकसले ईचारं, “नियमशास्त्रप्रमाणे शब्बाथ दिनले एखादाले मदत करानं चांगलं की, वाईट करानं चांगलं? जीव वाचाडानं चांगलं की, जीव लेवानं चांगलं?” पण त्या गप्पच राहीनात. 5मंग येशुनी संतापमा चारीबाजुले दखं अनी त्या लोकसना कठीण मनले दखीसन त्याले दुःख वाटनं, त्यानी लूळा हातना माणुसले सांगं, “तुना हात सरळ कर” त्यानी हात सरळ करा, अनी त्याना हात बरा व्हयना. 6तवय परूशी लगेच बाहेर निंघी गयात अनी येशुले मारी टाकानी योजना आखाकरता त्यासनी हेरोदीया नावना राजकीय पक्षनी भेट लिधी.
येशुना मांगे लोकसनी गर्दी
7मंग येशु त्याना शिष्यससंगे गालील समुद्रकडे गया, तवय गालील शहरमातीन लोकसनी गर्दी त्यानामांगे गयी, 8अनी यहूदीया, यरूशलेम, ईदोन अनं यार्देन नदीना पलीकडला सर्व गावे अनी सोर अनं सिदोन यासना जवळना प्रदेशना लोकसनी गर्दीनं गर्दी त्यानी करेल कामसविषयीन्या गोष्टी ऐकीसन त्यानाकडे वनी. 9#मार्क ४:१; लूक ५:१-३त्याना आजुबाजूले लोके गर्दी करीसन चेंगरी टाकतीन म्हणीसन त्यानी शिष्यसले पहिलेच एक नाव तयार करीसन ठेवाले सांगं. 10कारण त्यानी बराच लोकसले बरं करेल व्हतं. म्हणीसन जेवढा रोगी लोके व्हतात त्या त्याले स्पर्श कराले गर्दी करी राहींतात. 11जवय जवय दुष्ट आत्मा लागेल लोके त्याले दखेत तवय त्यानापुढे पडी जायेत अनी जोरमा वरडीन म्हणेत, “तू देवना पोऱ्या शे!”
12तवय तो त्यासले ताकिद दिसन सांगे, मी कोण शे हाई प्रकट करू नका.
येशु बारा प्रेषितसनी निवड करस
(मत्तय १०:१-४; लूक ६:१२-१६)
13मंग येशु डोंगरवर चढना अनी त्याले ज्या माणसे पाहिजे व्हतात त्यासले त्यानी बलायं अनं त्या त्यानाकडे वनात, 14तवय त्यानी त्यासनामाईन बारा जणसले निवडं अनी त्यासले प्रेषित #३:१४ प्रेषित सेवा कराकरता धाडेल शिष्यहाई नाव दिधं, ह्यानाकरता की, त्या त्यानासंगे राहतीन अनं तो त्यासले प्रचार कराले धाडी. 15अनी त्यासले दुष्ट आत्मा काढाना अधिकार राही.
16ह्या बारा जणसले त्यानी निवाडं; ते अस त्यानी शिमोनले पेत्र हाई नाव दिधं. 17याकोब अनी त्याना भाऊ योहान ह्या जब्दीना पोऱ्यासले येशुनी बोआनेर्गेश, म्हणजे “गर्जनाना पोऱ्या” अस नाव दिधं; 18आंद्रिया, फिलीप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीना पोऱ्या याकोब, तद्दय, शिमोन कनानी हाऊ रोमी शासन विरोधी. 19अनं येशुले धरी देणारा यहुदा इस्कर्योत.
येशु अनी बालजबुल
(मत्तय १२:२२-३२; लूक ११:१४-२३; १२:१०)
20मंग येशु घर वना पण तठे बी लोकसनी ईतली गर्दी करी की, त्याले अनं त्याना शिष्यसले जेवाले सुध्दा येळ नव्हती. 21हाई गोष्ट त्याना घरनासना कानवर गयी, तवय त्या त्याले घर लई जावाकरता तठे वनात, त्या सांगी राहींतात, त्याले येड लागेल शे.
22 # मत्तय ९:३४; १०:२५ पण यरूशलेम शहरतीन येल शास्त्री सांगेत, “बालजबूलनी #३:२२ बालजबूलनी दुष्ट आत्मासना राजात्याले पछाडेल शे! म्हणीसन त्याले दुष्ट आत्मा काढता येतस.”
23येशुनी त्यासले जोडे बलायं अनी दृष्टांतमा सांगु लागना की, “सैतानच सैतानले कशा काढु शकस? 24एखादा राज्यमा फुट पडनी तर ते टिकू शकस नही. 25एखादा घरमा फुट पडनी तर ते घर बी टिकु शकस नही. 26सैतानच स्वतःना राज्यमा फुट पाडी तर असामा त्याना टिकाव लागाव नही, त्याना शेवट व्हई.
27“एखादाले, पहीलवान माणुसनी घरनी संपत्ती लुटनी व्हई तर पहिले त्याले त्या पहीलवान माणुसले बांधनं पडी तरच तो त्याना घरनी संपत्ती लुटू शकस.
28“मी तुमले सत्य सांगस की, लोकसनी करेल सर्व पापसनी अनं त्यासनी करेल देवनी निंदा यासनी बी क्षमा त्यासले भेटी जाई 29#लूक १२:१०पण जो बी पवित्र आत्मानी निंदा करी त्यानी कधीच क्षमा व्हवाव नही तो सार्वकालिक पापना भागीदार राही.” 30“त्याले सैताननी पछाडेल शे,” असा त्या बोली राहींतात म्हणीसन येशु अस बोलना.
येशुना परीवार
(मत्तय १२:४६-५०; लूक ८:१९-२१)
31तवय येशुनी माय अनी त्याना भाऊ, बहिण तठे वनात, त्यासनी बाहेर उभा राहिन त्याले निरोप धाडा. 32येशुना बाजुले बराच लोके बशेल व्हतात, त्यासनी त्याले सांगं, “दख, तुनी माय अनं तुना भाऊ, बहिण बाहेर तुनी वाट दखी राहीनात.”
33येशुनी त्यासले उत्तर दिधं, “कोण मनी माय? अनी कोण मना भाऊ?” 34मंग त्यानी तठे बशेल लोकसकडे दखीसन सांगं, “दखा! हाई मनी माय अनी ह्या मना भाऊ, बहिण! 35कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय.”

Currently Selected:

मार्क 3: NTAii20

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in