यशायाह 43:16-17
यशायाह 43:16-17 MRCV
याहवेह असे म्हणतात— ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला, महासागरामधून रस्ता तयार केला, ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले, तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या, कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले