3
ख्रिस्ती वर्तन
1आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे, 2त्यांनी कोणाची निंदा करू नये व भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्यतेने आणि आदराने वागावे.
3पूर्वी आपण देखील मूर्ख व अवज्ञा करणारे; बहकलेले आणि वाईट सुखाभाग आणि दुष्ट वासना यांचे गुलाम असे होतो. क्रोध व हेवा यांनी आपली जीविते भरून गेली हाती आणि एक दुसर्यांचा द्वेष करणारे असे होतो. 4जेव्हा आपला तारणारा परमेश्वर यांची दया आणि प्रीती प्रकट होण्याची वेळ आली, 5तेव्हा त्यांनी आपले तारण केले, कारण आपण केलेल्या नीतिमानाच्या कृत्यामुळे झाले नाही, तर ते त्यांच्या दयेने झाले आणि आपल्याला नवीन जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण दिले आहे. 6त्यांनी पवित्र आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त यांच्याद्वारे आपल्यावर विपुलतेने ओतला आहे; 7म्हणून त्यांच्या कृपेमुळे आपल्याला नीतिमान असे ठरविता आले; आणि त्यांनी दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेनुसार आपण वारस व्हावे. 8मी तुला सांगितलेल्या या सर्वगोष्टी सत्य आहेत आणि या गोष्टींवर विशेष भर देऊन तू त्या सांगाव्या अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगले ते करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी उत्कृष्ट असून प्रत्येकाला लाभदायक आहेत.
9परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ व युक्तिवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहेत. 10तुमच्यामध्ये कोणी तट पाडीत असेल, तर त्याला पहिला व दुसरा इशारा दिला जावा, नंतर त्याच्याशी संबंध ठेवू नये. 11असा मनुष्य बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करतो, याची तू खात्री बाळग.
अखेरच्या सूचना
12अर्तमाला किंवा तुखिकाला मी तुझ्याकडे पाठविल्यानंतर शक्य तितक्या लवकर तू मला व निकोपोलीसला येथे येऊन भेट, कारण मी हिवाळ्यात तेथेच राहण्याचा निश्चय केला आहे. 13जेनस जो विधि-विशेषज्ञ व अपुल्लोस यांच्या प्रवासासाठी तुमच्याकडून शक्य होईल ती सर्व मदत करा आणि लक्ष ठेवा की, त्यांना लागणार्या गरजेच्या सर्वकाही गोष्टी त्यांच्याकडे आहेत.
14कारण मदतीची गरज असणार्यांना मदत करायला आपल्या लोकांनी शिकले पाहिजे, म्हणजे ते आपल्या दररोजच्या गरजा भागवू शकतील व निष्फळ जीवन जगणार नाही.
15माझ्याबरोबर असलेला प्रत्येकजण तुला अभिवादन पाठवितो.
जे विश्वासात आमच्यावर प्रेम करतात त्यांना सलाम सांगा.
कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.