YouVersion Logo
Search Icon

युहन्ना 3

3
येशू अन् निकदेमुस
1निकदेमुस नावाचा एक माणूस होता, तो यहुदी लोकायचा धार्मिक अगुवा होता, अन् तो एक परुशी होता. 2त्यानं रात्री येशूच्या पासी येऊन त्याले म्हतलं, “हे गुरुजी आमाले मालूम हाय, कि देवानं तुले आमाले शिकव्यासाठी पाठवलं हाय; कावून कि या चमत्काराले जे तू दाखवत, जर देव त्याच्या संग नाई हाय, तर नाई दाखऊ शकत.” 3येशूनं त्याले म्हतलं, “मी तुले खरं-खरं सांगतो, जर कोणी नव्यान नाई जन्मीन तो देवाच्या राज्याचा अनुभव नाई करू शकत.” 4निकदेमुसन त्याले म्हतलं, “माणूस जवा बुढा झाला, तवा तो कसा काय जन्म घेऊ शकतो? अन् हे पक्कं हाय कि एका माणसाले दुसऱ्या वेळा जन्म घेयासाठी तो आपल्या मायच्या पोटात परत जाऊ शकत नाई” 5येशूनं त्याले म्हतलं, “मी तुले खरं-खरं सांगतो, कि जतपरेंत कोणता माणूस पाणी अन् आत्म्यान नाई जन्मन ततपरेंत देवाच्या राज्यात प्रवेश नाई करू शकत.” 6एका माणसाचा जन्म शरीरान माय-बापापासून होते, पण आत्मिक रुपान तो आत्म्यान जन्मते. 7नवल नको करू, कि मी तुले म्हतलं, “तुमाले नवीन रीतीने जन्म घेणं अवश्य हाय. 8हवा जीकडे पायजे तिकडे वायते, अन् तू त्याच्या आवाज आयकतो, पण नाई समजत कि ते कुठून येते, अन् कुठसा जाते? जो कोणी पवित्र आत्म्यान जन्मला हाय, तो असाच हाय.” 9निकदेमुसन त्याले विचारलं, “ह्या गोष्टी कशा होऊ शकते?” 10ते आयकून येशूनं त्याले उत्तर देलं, “कि तू इस्राएल देशात एक महान शिक्षक हाय, अन् खरचं तुले ह्या गोष्टी समजाले पायजे.” 11मी तुले खरं-खरं सांगतो, “आमाले जे मालूम हाय, तेच सांगतो, अन् ज्यायले आमी पायलं त्यायची साक्ष देतो, अन् जे आमी म्हणतो त्याच्यावर तुमी विश्वास नाई करत.” 12जवा मी तुमाले जगात जे काई होते त्या गोष्टी सांगतल्या, अन् तुमी विश्वास नाई करत, तर जर मी तुमाले स्वर्गात काय होईन ह्या गोष्टी सांगतल्या, तर मंग तुमी कसा विश्वास करसान? 13स्वर्गातून उतरलेला जो माणसाचा पोरगा त्याच्याशिवाय कोणीहि स्वर्गात चढून गेला नाई. 14अन् ज्याप्रकारे मोशेनं सुनसान जागी पितळीच्या सर्पाले वरते चढवलं, त्याचं प्रकारे आवश्यक हाय, माणसाच्या पोराले पण वरते चढवल्या जाईन. 15यासाठी कि जो कोणी माह्यावर विश्वास करीन, तो नाश नाई होईन पण त्याले अनंत जीवन भेटन. 16“कावून कि देवानं जगातल्या लोकायवर इतकं प्रेम केलं कि त्यानं आपला एकुलताएक पोरगा देला, याच्यासाठी कि जो कोणी त्याच्यावर विश्वास करीन, तो नाश नाई होईन पण त्याले अनंत जीवन भेटीन. 17कावून कि, देवानं आपल्या पोराले जगात यासाठी नाई पाठवलं, कि जगातल्या लोकायवर दंडाची आज्ञा द्यावं, पण यासाठी कि जगातल्या लोकायचे त्याच्यापासून तारण व्हावे. 18जो देवाच्या पोरावर विश्वास करतो, त्याच्यावर दंडाची आज्ञा नाई होतं, पण जो त्याच्यावर विश्वास नाई करत, तो दोषी ठरवला गेला हाय; कावून कि त्यानं देवाच्या एकुलत्या एक पोरावर विश्वास नाई केला. 19अन् दंडाच्या आज्ञाचं कारण हे हाय, कि ऊजीळ जगात आला, अन् माणसानं अंधारले ऊजीळापेक्षा चांगलं समजलं, कावून कि त्यायचे काम बेकार होते. 20पण जो कोणी बेकार काम करते, तो ऊजीळाचा तिरस्कार करते, अन् ऊजीळाच्या जवळ येत नाई, असं नाई झालं पायजे कि त्यायचे बेकार काम दाखवल्या जावे. 21पण जो खऱ्यान चालते, तो ऊजीळाच्या जवळ येते, जेणे करून त्याचे काम प्रगट होवो कि त्यानं देवाच्या आज्ञाचं पालन करावं.”
येशूच्या बाऱ्यात योहानाची साक्ष
22हे झाल्यावर येशू अन् त्याचे शिष्य यहुदीया देशात आले; अन् तो तती त्यायच्या संग राऊन बाप्तिस्मा देत होता. 23-24योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले आतापरेंत जेलात नाई टाकल्या गेलं होतं, तो एनोन गाव जे सामरीया प्रांतात शालेम नगरा जवळ होता, जती लय पाणी होतं, अन् लोकं योहानापासी बाप्तिस्मा घेयाले येऊन रायले होते. 25तती योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे शिष्यायचे कोण्या यहुदी माणसा संग शुद्धीकरणाच्या रितीबद्दल वादविवाद झाला. 26अन् योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या शिष्यायनं योहानापासी येऊन त्याले म्हतलं, “हे गुरुजी जो माणूस यरदन नदीच्या तिकडे तुह्या सोबत होता, अन् ज्याच्या बाऱ्यात तू आमाले सांगतल होतं कि तो कोण हाय, पाह्य तो बाप्तिस्मा देत हाय, अन् सगळे लोकं त्याच्यापासी येत हाय.” 27योहानान उत्तर देलं, “जवा परेंत माणसाले स्वर्गातून नाई देल्या जाईन, ततपरेंत त्याले काहीच भेटू शकत नाई. 28तुमी तर स्वताच माह्ये साक्ष हा, कि मी म्हतलं, मी ख्रिस्त नाई, पण त्याच्या पयले पाठवल्या गेला हावो. 29नवरदेव नवरी सोबत लग्न करून घेते, पण नवरदेवाचा दोस्त उभा राऊन त्याचा आवाज आयकून आनंदित होते. ह्याच प्रकारे माह्या मन आनंदाने भरला हाय. 30अवश्य हाय कि, तो जास्त महत्वपूर्ण झाला पायजे अन् मी कमी महत्वपूर्ण झालो पायजे. 31जो स्वर्गातून येते, तो सर्वोत्तम हाय, जो पृथ्वी वरून येते तो पृथ्वीचा हाय; अन् पृथ्वीच्याच गोष्टी सांगते, जो स्वर्गातून येते, तो सगळ्यायच्या वर हाय. 32जे काई त्यानं पायलं, अन् आयकलं हाय, त्याचीच साक्ष देते; अन् थोडेचं लोकं त्याच्या साक्षीवर विश्वास करते. 33पण ज्यानं त्याच्या साक्षीवर विश्वास केला, त्यानं या गोष्टीवर छाप देली कि देवबाप खरा हाय. 34कावून कि ज्याले देवानं पाठवलं हाय, तो देवाच्या गोष्टी करते, कावून कि तो पवित्र आत्मा पूर्ण पणे देते. 35देवबाप पोरावर प्रेम करते, अन् त्यानं सगळं काही, त्याच्या हातात देलं हाय. 36जो देवाच्या पोरावर विश्वास ठेवतो, अनंत जीवन त्याचचं हाय; पण जो पोराचं नाई आयकतं त्याले अनंत जीवन भेटन नाई, पण देवाचा दण्ड त्याच्यावर रायते.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in