लुका 1
1
लूकाचा उद्देश्य
1आदरणीय थियूफिलूस, बऱ्याचं लोकायन आमच्यात झालेल्या घटनेच्या बाऱ्यात एक वृतान्त लिवण्यासाठी प्रयत्न केला हाय. 2त्यायनं ठिक तसचं लिवलं, जसं त्या व्दारे आमाले सांगतले गेले होते. त्यायनं येशूले त्याच्या सेवेच्या सुरवाती पासून पायले होते. अन् जे नंतर देवाच्या वचनाचे सेवक बनले, त्यायनं ह्या गोष्टी आमच्या परेंत पोहचवल्या. 3हे आदरणीय थियूफिलूस मी पण या सगळ्या गोष्टीला ध्यानपूर्वक तपासून पायल्या, अन् मले हे चांगलं वाटलं कि मी या घटनेला तुमच्यासाठी क्रमानुसार लिवतो. 4मी हे यासाठी लिवतो कावून कि तुमाले त्या गोष्टीची खरी-खरी माईती मालूम व्हावी.
जखऱ्या अन् अलीशिबा
5जवा हेरोद राजा यहुदीया प्रांताच्या राजा होता, याच्या दिवसात अबिया नावाच्या याजकाच्या वर्गात जखऱ्या नावाचा एक याजक होता, अन् त्याची बायको हारोनाचा वंशातली होती, जिचं नाव अलीशिबा होतं. 6अन् ते दोघही देवाच्या समोर धर्मी होते, कावून कि ते देवाच्या सगळ्या आज्ञा अन् विद्या प्रमाण वागत होते, अन् निर्दोष जीवन जगत होते. 7पण त्यायले लेकरू नव्हत, कावून कि अलीशिबा वांजोटी होती, अन् ते दोघही बुढे होते.
देवदूतायच्या व्दारे योहानच्या जन्माची भविष्यवाणी
8एका दिवशी जवा जखऱ्याचा याजक समूह यरुशलेमच्या देवळात देवाच्या समोर सेवा करत होते, अन् तो याजक म्हणून देवाच्या उपस्थिती मध्ये सेवा करत होता. 9तवा याजकाच्या रीतीच्या अनुसार, त्याले वेदीवर धूप जाळासाठी चिट्टी टाक्याच्या व्दारे निवडल्या गेलं होतं, कि तो प्रभू देवळात जावे अन् धूप जाळे. 10अन् धूप जाळ्याच्या वाक्ती लोकायचा सरा समुदाय बायर देवळाच्या आंगणात प्रार्थना करत होता. 11तवा प्रभूचा एक देवदूत धुपवेदीच्या उजव्या बाजूनं उभा असलेला त्याले दिसून आला. 12अन् त्याले पाऊन जखऱ्या घाबरला, त्याले लय भेऊ लागला. 13पण देवदूताने त्याले म्हतलं, “हे जखऱ्या! भेऊ नको, कावून कि देवानं तुह्याली प्रार्थना आयकली हाय, तुह्याली बायको अलीशिबा एका पोराले जन्म देईन अन् तू त्याच्यावाल नाव योहान ठेवजो.
14अन् तुले आनंद उल्हास वाटीन अन् लय लोकं त्याचा जन्म झाल्यान हर्षउल्हास करतीन. 15कावून कि तो प्रभूच्या दुष्टीत महान होईल, अन् अंगुराचा रस व दारू कधी पेईन नाई, अन् आपल्या मायच्या गर्भातूनचं पवित्र आत्म्यान परिपूर्ण अशीन. 16अन् तो इस्राएल देशातून लय लोकायले त्यायच्या प्रभू देवाकडे वापस घेऊन येईन. 17योहान एक असा माणूस अशीन जो एलिया भविष्यवक्ता सारखा आत्मा अन् सामर्थ्याने भरून राईन, तो देवाचा रस्ता तयार करीन अन् बापाचं मन लेकरायकडे फिरवन; अन् तो आज्ञा नाई मानणाऱ्या लोकायले देवाचं ज्ञान स्वीकार करवणार, अन् प्रभूच्या साठी सिद्ध प्रजा तयार करणार.” 18तवा जखऱ्यानं देवदूताले विचारलं, “हे मी कसं काय विश्वास करू, कि आमच्या सोबत असं होईन? कावून कि मी तर बुढा हाय, अन् माह्याली बायको पण बुढी हाय.”
19देवदूतान त्याले उत्तर देलं, “मी गर्ब्रीएल देवदूत हाय जो देवा समोर उभा रायतो, अन् तुह्या संग बोल्याले, अन् तुले हे सुवार्था सांगण्यासाठी मले पाठवण्यात आलं हाय. 20अन् पाह्य, हे असं होईन त्या दिवसापरेंत तू मुका रायशीन, अन् तुले बोलता येईन नाई, कावून कि तू माह्या वचनावर जे पूर्ण होणार हाय, विश्वास ठेवला नाई, जे आपल्या वेळेवर खरा ठरणार, तू बोलण्यात असमर्थ रायशीन, जतपरेंत पोरगा जन्मन नाई ततपरेंत तू काईच बोलू नाई शकशीन.” 21तवा देवळाच्या आंगणात लोकं जखऱ्याची वाट पायतं होते, अन् त्यायले आश्चर्य वाटलं कि त्याले देवळात येवढा उशीर कावून लागून रायला?
22मंग जवा तो बायर आला तवा त्याले, त्यायच्या संग बोलता येत नव्हत, तवा त्यायनं ओयखलं कि याले देवळात काई तरी दर्शन भेटलं हाय, अन् तो त्यायले खुणावू लागला, व मुका रायला. 23जवा देवळात एक याजकाच्या रुपात त्याची सेवेचा हप्ता पूर्ण झाला, तवा तो यरुशलेम शहरातून आपल्या घरी गेला. 24काई दिवसानंतर जखऱ्याची बायको अलीशिबा गर्भवती रायली; अन् पाच महिन्या परेंत अलीशिबानं स्वताले लोकायच्या नजरे पासून लपवून ठेवलं कावून कि ती गर्भवती होती. 25ती स्वतालेच असं म्हणत होती, “लोकाईत माह्यावाला अपमान दूर कऱ्यासाठी प्रभूने माह्यावर कृपा केली हाय.”
देवदूताचं मरियेच्या समोर प्रगट होणं
26-27जवा अलीशिबा सहाव्या महिण्याची गर्भवती होती, तवा देवाच्या इकून, गर्ब्रीएल देवदूत गालील प्रांताच्या नासरत नगरात एका कुमारीच्या पासी पाठवल्या गेला, जिची सोयरिक योसेफ नावाचा माणसा संग झाली होती, जो दाविद राजाच्या खानदानीतला होता अन् त्या कुमारीचं नाव मरिया होतं. 28अन् देवदूतान मरियेपाशी अंदर येऊन म्हतलं आनंद अन् जय तुह्याली असो देवाने तुह्यावर लय कृपा केली हाय प्रभू तुह्या बरोबर हाय, तू सगळ्या बायामध्ये धन्य हायस! 29जवा मरियाने त्याच्या शब्दाले आयकलं, तवा ती लय भेली, अन् हा विचार करू लागली, कि हा अभिवादनचा अर्थ काय अशीन?
30देवदूतान तिले म्हतलं, “हे मरिया भेऊ नको, कावून कि देवाची कृपा तुह्यावर हाय 31आयक, तू गर्भवती रायशीन, अन् तुले एक पोरगा होईन, त्याचं नाव येशू ठेवजो. 32तो महान होईल अन् त्याले परमप्रधान देवाचा पोरगा म्हणतीन, प्रभू देव त्याले त्याच्या पूर्वज दाविद राजाचे राजासन देईन. 33अन् तो याकोबाच्या खानदानीवर युगानुयुग राज्य करीन अन् तो नेहमी साठी राजाच्या रुपात राज्य करीन.” 34तवा मरियानं देवाच्या देवदूताले म्हतलं, “हे कसं काय होईन? माह्याल तर अजून लग्न नाई झाले.”
35तवा देवाच्या देवदूतान तिले उत्तर देलं, “पवित्र आत्मा तुह्यावर येईन, अन् महान परमप्रधान देवाची सामर्थ तुह्यावर छाया करीन. ह्या कारणान तुह्या पासून जन्म घेणारा पोरगा पवित्र राईन, त्याले देवाचा पोरगा असं म्हणतीन. 36अन् आयक, तुह्यावाल्या नात्यातली अलीशिबा हिले पण म्हतारपणी पोराचा गर्भ रायला हाय, अन् जिले वांजोटी म्हणत होते तिले सहावा महिन्याचा गर्भ हाय. 37कावून कि देवासाठी काईच असंभव नाई.” 38तवा मरियानं म्हतलं, “आयक, मी प्रभूची दासी हाय, मले तुह्या शब्दा प्रमाणे होवो,” मंग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
अलीशिबाच्या जवळ मरियाचं जाणं
39काई दिवसानं मरिया घाईघाईन निघून पहाडी देशातल्या यहुदा प्रांतातल्या एका गावात गेली. 40मरियानं जखऱ्याचा घरी जाऊन अलीशिबा ले नमस्कार केला. 41तवा असं झालं कि अलीशिबानं मरियाचा नमस्कार आयकला तवाच तिच्या पोटातल्या लेकरानं गुतकून उडी मारली, अन् अलीशिबा पवित्र आत्म्यान परिपूर्ण झाली.
42अन् तिले आनंदाने मोठ्या आवाजात म्हतलं, “तू सगळ्या बाया मधून धन्य हायस, अन् ते लेकरू ज्याले तू जन्म देणार धन्य हाय! 43हि कृपा मले कशी झाली हाय, कि माह्या प्रभूची माय माह्यापासी भेट्याले आली हाय. 44अन् आयक, मी तुह्या नमस्कार आयकला, तसचं माह्या पोटातल्या लेकरानं आनंदाने उडी मारली. 45तू धन्य हाय, कावून कि तू विश्वास केला, कि ज्या गोष्टी प्रभून तुह्या सोबत केल्या होत्या, ते तो पूर्ण करीन.”
मरिये कडून देवाची स्तुती
46तवा मरियानं म्हतलं, “मी देवाचा गौरव करतो. 47अन् देव जो माह्या तारणारा त्याच्या ठाई मी आनंदित झाली हाय. 48कावून कि त्यानं आपल्या, दाशीच्या दैन्यावस्तेचें अवलोकन केलं हाय पाहा, आतापासून साऱ्या पिढ्या मले धन्य म्हणतीन. 49कावून कि, त्या शक्तिमान देवानं माह्यासाठी मोठं-मोठे काम केले हायत अन् त्याचं नाव पवित्र हाय. 50अन् जे त्याचा भय धरतात, त्याच्यावर त्याची दया पिढ्यान-पिढ्या बनून राईन. 51त्यायनं आपल्या शक्तीन पराक्रमाचे काम केले हाय, अन् जे मनात घमंड करतात, त्याने त्यायले हरवले हाय.
52त्यानं अधिकाऱ्यायले राजासनावरून होडून काढलं हाय, अन् दीन लोकायचा आदर केला हाय. 53देवानं भुक लागलेल्या लोकायले चांगल्या वस्तुनं तृप्त केलं हाय, व धनवान लोकायले रिकाम्या हातांन लाऊन देलं हाय, 54ते प्रतिज्ञा जे देवाने बापदादायच्या संग केलती, ते आठोन ठेऊन, तो आपल्या इस्राएल देशाच्या लोकायची मदत करायले आला. 55त्यानं अब्राहामाला अन् त्याच्या सर्व खानदानीले सर्वकाळ दया दाखव्यासाठी आठोन केली हाय.” 56मरिया जवळपास तीन महिने अलीशिबाच्या घरी राऊन, परत आपल्या घरी वापस आली.
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचा जन्म
57अलीशिबाचे गर्भवती पणाचे दिवस पूर्ण झाल्यावर तिले पोरगा झाला. 58प्रभूने तिच्यावर मोठी दया केली, हे आयकून तिच्या शेजारच्यायनं अन् तिच्या सोयऱ्यायनं तिच्या संग आनंद केला. 59मंग असं झालं जन्म झाल्याच्या आठव्या दिवशी त्या लेकराचा खतना कऱ्याले आले, तवा त्याचं नाव त्याच्या बापाच्या नावावरून जखऱ्या ठेव्याची इच्छा होती. 60पण त्याची माय अलीशिबानं उत्तर देलं, “नाई, ह्याच नाव योहान ठेव्याचं हाय,” 61पण त्यायनं तिले म्हतलं, “ह्या नावाचा माणूस तुह्यावाल्या सोयऱ्याईत कोणीचं नाई हाय.”
62तवा त्यायनं, त्या लहान लेकराचा बाप जखऱ्याले खुणाऊन विचारलं, कि तुले ह्याच कोणतं नाव ठेव्याचं हाय. 63त्यानं लिव्याची पाटी मांगीतली अन् लिवून देलं, कि त्याचं नाव योहान हाय, तवा सगळ्यायले आश्चर्य वाटलं. 64तवा तो लगेचं जिभेने बोलायले लागला, व देवाचा गौरव करू लागला. 65अन् त्याच्या अवतीभोंवती रायनाऱ्या सगळे लोकं भेऊन गेले अन् ह्या सगळ्या गोष्टी यहुदीया प्रांतातल्या सगळ्या पहाडी देशात पसरल्या. 66अन् साऱ्या आयकणाऱ्यायनं ह्या गोष्टी आपल्या मनात विचार करून म्हतल्या, हे लेकरू कसं होईन, कावून कि प्रभूची सामर्थ त्याच्यावर होती.
जखऱ्याची भविष्यवाणी
67अन् त्याचा बाप जखऱ्या, हा पवित्र आत्म्यान परिपूर्ण झाला, अन् भविष्यवाणी करून बोलू लागला. 68“धन्य हाय प्रभू, इस्राएलाचा देव कावून कि त्यानं आपल्या लोकायले पाऊन त्यायच्यावर लक्ष देलं हाय अन् त्यायचं तारण केलं हाय. 69अन् त्यानं आमाले त्याचा दास दाविद राजाच्या खानदानीतून आपल्यासाठी एक शक्तिशाली तारणाऱ्याले पाठवले हाय. 70-71सगळ्यात आगोदर प्रभून आपल्या पवित्र भविष्यवक्त्याच्या जे जगाच्या पयलेपणा पासून म्हतलं होतं. कि तो आमाले आमच्या शत्रू पासून, अन् त्या सगळ्या लोकायच्या शक्तीपासून आमचं तारण करीन जे आमचा राग करतात. 72त्यानं म्हतलं कि तो आपल्या बापदादायवर दया करीन, अन् आपल्या पवित्र कराराले आठवण करीन.
73त्याने आपल्या बापदादा अब्राहाम संग शपत देऊन करार केला, कि तो आमाले शत्रू पासून सोडीन जोपरेंत आपण जिवंत हावो, त्याच्या उपस्थिती मध्ये पवित्रतेन अन् धार्मिकतेन न भेता देवाची सेवा करू शकावे, 74कि तो आमाले आमच्या शत्रू पासून वाचविन. 75कि आमी जोपरेंत जिवंत हावो त्याच्या हजेरीत पवित्रता अन् धार्मिकतेन होऊन देवाची सेवा करावी. 76अन् हे लेकरा, तुले परमप्रधान देवाचा भविष्यवक्ता म्हणतीन, कावून कि तू प्रभूच्या रस्ता तयार कऱ्याले त्याच्या आगोदर पाठवले गेले हाय.
77याच्यासाठी कि, तो आपल्या लोकायले पापाची क्षमा करण्याच्या व्दारे, त्यायले तारणाचं ज्ञान देईन. 78हे आमच्या देवाच्या त्या मोठ्या दयेने होईन, जसं सूर्य आमाले ऊजीळ द्यायले चमकते तसचं ख्रिस्त आमच्या जवळ स्वर्गातून येईन. 79जे अंधारात बसले#1:79 जे अंधारात बसले पापात रायणारे अन् मरणाच्या सावलीत#1:79 मरणाच्या सावलीत न संपनाऱ्या मरणाच्या सावलीत हायत ऊजीळ देतात, हा ऊजीळ आपल्याले त्या तरीक्यान मार्गदर्शन करीन जे आमाले देवाच्या संग शांती देतात.”
80अन् ते लेकरू योहान वाढत गेला अन् देवाच्या आत्मेत मध्ये मजबूत होतं गेला, अन् इस्राएल लोकायच्या मधात प्रचार करायच्या दिवसापरेंत सुनसान जागी रायला.
Currently Selected:
लुका 1: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

: