लुका 4:9-12
लुका 4:9-12 VAHNT
मंग सैतानाने येशूले पवित्र शहर यरुशलेम शहरात नेऊन देवळाच्या काटावर उभं केलं; अन् त्याले म्हतलं, “जर तू देवाचा पोरगा असशीन, तर आपल्या स्वताले खाली पाडून सिद्ध कर, तुले मार नाई लागीन कावून कि पवित्रशास्त्रात असं लिवलेले हाय, कि तो आपल्या देवदूतायले आज्ञा करीन, कि तुह्यावाली रक्षा करावी, अन् ते तुह्याले पाय गोट्यावर आपटू नये म्हणून आपल्या हातावर झेलून घेतीन.” तवा येशूनं त्याले उत्तर देलं, “हे पण पवित्रशास्त्रात सांगतलेले हाय, कि तू प्रभू आपल्या देवाची परीक्षा पाऊ नको.”