YouVersion Logo
Search Icon

लुका 7:21-22

लुका 7:21-22 VAHNT

त्याचं वेळी त्यानं लय लोकायले जे बिमार, त्रासात, अन् भुत आत्मानं ग्रसित होते त्यायले मुक्त केलं, अन् लय फुटक्यायले डोये देले. अन् त्यानं योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या शिष्यायले म्हतलं, “जे काई तुमी पायलं, अन् आयकलं हे सगळे योहानाले जाऊन सांगा. कि फुटके पायतात अन् लंगडे चालतेत अन् कुष्ठरोगी बरे केले जातेत, अन् गोरगरिबायले सुवार्था सांगतली जाते.