लुका 7:7-9
लुका 7:7-9 VAHNT
म्हणून मी स्वताले ह्या योग्य पण नाई समजलं, कि तुह्यापासी येऊ, पण तू येथून जरी बोलला तरी माह्याला सेवक बरा होऊन जाईन. मी पण दुसऱ्यायच्या आधीन हाय, अन् सेवक माह्या आधीन हाय, अन् जवा एकाला म्हणतो कि जाय, तवा तो जाते, अन् दुसऱ्याले म्हणतो ये, तवा तो येते, अन् जवा आपल्या सेवकाला म्हणतो हे कर, तवा तो ते करते.” हे आयकून येशू हापचक झाला, अन् जे लोकं त्याच्या मांग येऊ रायले होते त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं सांगतो, कि मी इस्राएल देशामध्ये एक हि असा व्यक्ती नाई पायला, जो या अन्यजाती माणसा सारखा माह्यावर भरोसा करते.”