मत्तय 21
21
येशूचे यरुशलेमात स्वागत
(मार्क 11:1-11; लूका 19:28-38; योहान 12:12-19)
1जवा येशू अन् त्याचे शिष्य यरुशलेम शहराच्या जवळ पोचले, तवा ते जैतून पहाडाच्या बैथफगे गावात आले, तवा येशूनं आपल्या शिष्यातून दोघायले हे म्हणून पाठवले, 2“कि समोरच्या गावात जा, अन् तती गेल्यावर तुमाले एक गधी बांधलेली दिसीन, अन् तिच्या सोबत तिचा पिल्लू भेटन, त्याले सोडून माह्याल्या पासी आणा. 3अन् तती जर तुमाले कोणी पुसीन, तर सांगजा कि आमच्या प्रभूले याची गरज हाय, अन् तो लवकर त्याले पाठून देईन.”
4हे यासाठी झालं, कि जे वचन भविष्यवक्त्याच्या व्दारे पवित्रशास्त्रात म्हणल्या गेलं होतं, ते पूर्ण व्हावं, 5“कि यरुशलेम शहराच्या लोकायले सांगा, पाह्य, तुह्याल्या राजा तुह्यापासी येत हाय, तो नम्र हाय, अन् गध्यावर बसलेला हाय, वरण गध्याच्या पिल्लूवर बसला हाय.”
6येशूनं शिष्यायले जसं सांगतल होतं, त्यायनं तसचं म्हतलं, तवा लोकायन त्यायले गध्याचं पिल्लू घेऊन जाऊ देलं. 7मंग त्यायनं ते गध्याचं पिल्लू येशू पासी आणलं, अन् त्याच्यावर आपले कपडे टाकले, व येशू त्याच्यावर बसला. 8तवा लय लोकायन येशूच्या समोर रस्त्यावर आपआपले कपडे आतरले, काई लोकायन येशूले आदर देण्यासाठी वावरातून झाडाच्या फांद्या आणल्या, अन् रस्त्यावर आतरल्या.
9अन् जे गर्दी समोर-समोर जाऊ रायली होती, ते मांग-मांग येऊ रायली होती, अन् मोठं-मोठ्याने स्तुती करून म्हणत होते, कि “दाविद राजाच्या पोराले होसान्ना#21:9 होसान्ना होसान्ना हा एक इब्रानी शब्द हाय ज्याचा अर्थ प्रभू आमाले वाचव धन्य हाय तो जो प्रभूच्या नावाने येतो, स्वर्गात होसान्ना#21:9 होसान्ना होसान्ना हा एक इब्रानी शब्द हाय ज्याचा अर्थ प्रभू आमाले वाचव.” 10मंग येशूनं यरुशलेम शहरात प्रवेश केला, तवा साऱ्या नगरात हाहाकार झाला, अन् लोकं म्हणत होते, “हा कोण हाय?” 11लोकांनी म्हतलं, “हा गालील प्रांतातला नासरत नगरचा भविष्यवक्ता येशू हाय.”
देवळातून देवानं घेवाण करणाऱ्यायले हाकलून देणे
(मार्क 11:15-19; लूका 19:45-48; योहान 2:13-22)
12येशूने देवाच्या देवळात जाऊन, त्या सर्वांना, जे देवळात देवाण-घेवाण करत होते, हाकलून लावलं, अन् व्यापाराचे मेज अन् कबुतरायले विकणाऱ्यायच्या बैठकी उलटून टाकल्या. 13अन् त्यायले म्हतलं, पवित्रशास्त्रात असं “लिवलेल हाय, कि लोकं माह्या घराले प्रार्थनेचं घर म्हणतीन, जती सगळ्या जातीचे लोकं प्रार्थना कऱ्याले येते, त्या देवळाले तुमी लुटारूची गुफा बनून टाकली हाय.”
14तवा फुटके, अन् लंगडे यरुशलेम देवळात त्याच्यापासी आले, अन् येशूनं त्यायले बरे केलं. 15पण मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायनं हे अद्भभुत काम जे येशूनं केले होते, अन् लेकरायले देवळाच्या आंगणात दाविद राजाच्या पोराची स्तुती हो असे म्हणतांना पायले, तवा रागात येऊन त्याले म्हणू लागले, काय तू हे आयकतं हाय कि हे काय म्हणत हाय?
16येशूने त्यायले म्हतलं, “काय तुमी हे कधी पवित्रशास्त्रात नाई वाचलं” कि “लेकरं अन् दुध पेणाऱ्या लेकरायच्या तोंडातून तुह्यी स्तुती होईन.” 17तवा येशू त्यायले सोडून नगराच्या बायर, बेथानी गावात गेला, अन् तती रात्रभर रायला.
अंजीराच्या झाडापासून शिकवण
(मार्क 11:12-14,20-24)
18सकाळी जवा येशू अन् त्याचे शिष्य नगरात वापस येऊन रायले होते तवा येशूले भूक लागली. 19अन् एक अंजीराचे झाड सडकीच्या काटावर पाऊन तो त्याच्यापासी गेला, त्याले झाडावर फक्त पाला-पाला दिसला कावून कि अजून झाडाले अंजीर लाग्याची वेळ आली नव्हती; तवा येशूनं त्या झाडाले म्हतलं, “आतापासून तुले फळ येणार नाईत, तवा अंजीराचे झाड लवकरच सुकून गेलं.”
20हे पाऊन शिष्यायले नवल वाटलं, अन् येशूले म्हतलं, “हे अंजीराचे झाड एकदम कसकाय सुकलं?” 21येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी तुमाले खरं सांगतो, देवावर विश्वास ठेवा, अन् आपल्या मनात शंका करू नका, तुमी फक्त हेच नाई करसान, जे ह्या अंजीराच्या झाडा संग केलं, पण जे कोणी या पहाडाले मनीनं, तू बुडापासून उपटून समुद्रात जा, अन् आपल्या मनात असा विश्वास करीन कि हे झालं तर त्याच्या बोलण्या प्रमाणच त्यासाठी ते होऊन जाईन.
22अन् जे काई तुमी प्रार्थना करून विश्वासाने मांगसान, ते तुमाले भेटीन.” 23एक दिवस येशू देवळात जाऊन देवाच वचन शिकवून रायला होता, तवा मुख्ययाजक अन् यहुदी पुढारी लोकायन त्याच्यावाल्या पासी येऊन विचारलं, “तू हे काम कोणाच्या अधिकारानं करतो, तुले कोण हा अधिकार देला हाय?”
यहुदी पुढाऱ्याचा येशूच्या अधिकारावर शंका
(मार्क 11:27-33; लूका 20:1-8)
24येशूनं त्यायले म्हतलं, “मी पण तुमाले एक प्रश्न विचारतो जर मले उत्तर द्यान, तवा ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकारानं करतो ते मी तुमाले सांगीन. 25योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता, कि माणसापासून होता? याचे मले उत्तर द्या.” तवा ते आपआपसात, विचार करू लागले स्वर्गापासून हाय असं म्हणू तर मंग तो मनीनं तुमी त्याच्यावर विश्वास कावून केला नाई?
26अन् जर म्हणू कि माणसापासून होता, तर त्यायले लोकायचा भेवं लागत होता, कावून कि योहान बाप्तिस्मा देणारा खरोखरचं देवाचा संदेश देणारा होता कावून कि ते सगळे योहानाला भविष्यवक्ता मानत जात होते. 27तवा त्यायनं येशूले उत्तर देलं, “आमाले माईत नाई” येशूनं त्यायले म्हतलं “तर मंग कोणत्या अधिकारानं मी ह्या गोष्टी करतो, हे तुमाले सांगत नाई.”
दोन पोराची कथा
28तुमी या कथेतून काय समजता, कोण्या माणसाचे दोन पोरं होते, त्यानं पयल्याच्या पासी जाऊन म्हतलं, हे पोरा आज अंगुराच्या वाडीत काम कर. 29त्यानं उत्तर देलं, मी जाणार नाई, पण मंग आपलं मन बदलून कामावर चालला गेला. 30मंग त्या माणसानं दुसऱ्या पोरापासी जाऊन असचं म्हतलं, त्यानं उत्तर देलं, हो जातो, पण नाई गेला.
31या दोघा पैकी कोणत्या पोरानं बापाची इच्छा पूर्ण केली, त्यायन म्हतलं, पयल्या पोरानं, येशूने त्यायले म्हतलं, मी तुमाले खरं सांगतो, कि करवसुली करणारे अन् वेश्या सारखे पापी लोकं तुमच्या पयले देवाच्या राज्यात प्रवेश करणार.
32मी असं याच्यासाठी म्हणतो, कि जवा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने तुमाले सांगतल, कि कसं चांगल्या प्रकारान जीवन जग्याच हाय, तवा तुमी त्याच्यावर विश्वास नाई केला, पण कर घेणाऱ्यान अन् वेश्यायन मन फिरवलं अन् विश्वास केला, पण तुमी पाऊन पण नाई पसतावले अन् त्याचावर विश्वास नाई केला.
वाईट शेतकऱ्यायची कथा
(मार्क 12:1-12; लूका 20:9-19)
33आणखी एक कथा आयका, “कोण्या एका माणसाने अंगुराची वाडी लावली, अन् त्याच्या भवती चार कोपऱ्यावर गोट्यायचा आवार बनवला, अन् रसाचा हऊद बनवला अन् एक वरून कुंपण बनवलं, अन् तो अंगुराच्या वाडीले ठेक्यानं देऊन प्रदेशात चालला गेला.” 34जवा फळ याची वेळ जवळ आली, तवा त्यानं आपल्या नौकराले आपले फळ घेयासाठी ठेकेदाराच्या इकळे पाठवलं,
35पण वाडीच्या ठेकेदारायन नौकराले झोडलं अन् कोणाले मारून टाकलं, अन् कोणाले गोटे मारले. 36मंग वाडीच्या मालकान अजून दुसऱ्या नौकराले त्यायच्या इकडे पाठवलं, जे पयले पेक्षा जास्त होते, ठेकेदारायन त्यायच्या संग पण तसचं केलं. 37शेवटी त्यानं त्याच्या पोराले त्यायच्यापासी असा विचार करून पाठवलं, कि ते माह्या पोराचा मानदान व आदर सन्मान करतीन.
38पण ठेकेदारायन पोराले पाऊन आपसात विचार करून असं म्हतलं हा तर वारीस हाय, चला आपण त्याले मारून टाकू मंग वाडी आपलीच होऊन जाईन. 39-41अन् त्यायनं त्याले पकडलं, अन् अंगुराच्या वाडीच्या बायर हकालुन मारून टाकलं, म्हणून, आता तो अंगुराच्या वाडीचा मालक त्या ठेकेदाराय सोबत असं करीन की, तो येऊन त्या वाडीच्या ठेकेदाराले मारून टाकीन, अन् अंगुराची वाडी दुसऱ्याईले देईन.
42येशूने त्यायले म्हतलं, काय तुमी कधी पवित्रशास्त्रात हे वाचलं नाई, कि ज्या गोट्याले राजमिस्त्रीयांनी निकामी ठरवलं, तोच कोपऱ्याचा मुख्य गोटा झाला. 43हे प्रभूच्या इकून झालं, “म्हणून मी तुमाले म्हणतो, कि देवाचं राज्य तुमच्या पासून घेऊन घेतल्या जाईन, अन् अशा अन्यजातीले जे त्याचं उत्तम परिणाम आणतील त्यायले देऊन देल्या जाईन.
44जो या गोट्यावर पडीन, तो चकनाचूर होऊन जाईन, अन् ज्यावर तो पडीन, त्याले पिसून टाकीन.” 45मुख्ययाजक अन् परुशी लोकायन त्याच्यावाल्या कथेला आयकून, समजून गेले, कि तो आमच्या विषयात हि गोष्ट म्हणत हाय. 46अन् त्यायनं त्याले पकड्याले पायलं, पण लोकायले भेत होते, कावून कि ते त्याले देवा कडून आलेला भविष्यवक्ता मानत होते.
Currently Selected:
मत्तय 21: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

: