मत्तय 28:12-15
मत्तय 28:12-15 VAHNT
तवा त्यायनं यहुदी पुढाऱ्याय संग एकजूट होऊन सल्ला केला अन् लाचं म्हणून लय पैसे देले. हे सांगासाठी कि रात्री जवा आमी राखण कऱ्याच्या वाक्ती झोपून रायलो होतो, तवा येशूच्या शिष्यांनी येऊन त्याचं शरीर चोरून घेऊन गेले. अन् जर हे गोष्ट राज्यपालापासी पोहचली तर आमी त्याले समजावून देऊ, अन् तुमाले जोखीम पासून वाचवून घेऊ. मंग त्यायन पैसे घेऊन जसं शिकवलं गेलं होतं तसचं केलं, अन् हे गोष्ट तवा पासून तर आजपर्यंत यहुदी लोकात चालू हाय.