YouVersion Logo
Search Icon

मरकुस 13

13
देवळाच्या विनाशाची भविष्यवाणी
(मत्तय 24:1-2; लूका 21:5-6)
1जवा येशू देवळातून बायर निघून रायला होता, त्याच्या शिष्यायतून एका शिष्यान म्हतलं कि “हे गुरुजी पाहा कसे-कसे मोठ्या गोट्याईचे सुंदर इमारती हायत.” 2येशूनं त्याले म्हतलं कि “या मोठ्या इमारती ज्यायले तुमी पायत हा, पण मी तुमाले सांगतो कि वैरी ह्या सर्व्या देवळाले नष्ट करीन अन् इथं एक पण दगड नाई दिसन.”
संकट अन् दुःख
(मत्तय 24:3-14; लूका 21:7-19)
3तवा येशू देवळातून निघून जैतून पहाडावर चढला अन् देवळाच्या समोर उतारावर बसला, अन् पतरस, याकोब, अन् योहान, अन् आंद्रियासन जवा ते त्याच्या सोबत एकटे होते त्यायनं येशूला विचारलं 4“आमाले सांग कि या गोष्टी कधी होतील, अन् जवा ह्या गोष्टी पुऱ्या होतीन, त्या वाक्तीच चिन्ह काय होईन.” 5मंग येशूनं त्यायले म्हतलं, “कि सावध राहा, कोणी तुमाले फसवलं नाई पायजे. 6बरेचं लोकं माह्या नावाचा उपयोग करून येतीन, अन् म्हणतीन, कि मी ख्रिस्त हावो, असे म्हणून बऱ्याचं लोकायले विश्वासात घेऊन फसवतीन. 7जवा तुमी लढाया मांग लढायाच्या विषयी आयकसान, तवा तुमी भेऊ नका, कावून कि हे होणे पक्के हाय, पण हा जगाचा अंत नाई हाय.
8मंग एका जातीचे लोकं अन्यजातीच्या लोकायवर हमला करतीन, अन् एका देशाचे लोकं दुसऱ्या देशाच्या लोकायच्या विरुध्य लढाई करतीन, अन् कुठीसा पण भूपंक होईन, व अकाल पडीन, ही ताडना गर्भवती बाईला जवा लेकरू व्हायची सुरुवात होते त्या वेदने पेक्षा जास्त राईन. 9पण तुमी आपल्या विषयात सावध राहा, कावून कि तुमचे वैरी तुमाले, न्यायसभेत घेऊन जातीन, अन् धार्मिक सभास्थानात तुमाले दंड देतीन, माह्य अनुसरण केल्यामुळे तुमाले शिपाई राजाईच्या समोर उभं करतीन, कावून कि तुमी अन्यजाती लोकायले देवाचा संदेश द्यावा. 10या आगोदर हे पण कि जगाच्या शेवट येण्याच्या पयले माह्या विषयाची सुवार्था अन्यजातीच्या लोकाई परेंत, प्रचार केल्या जाईन.
11जवा ते तुमाले न्यायालयात घेऊन जातीन, तुमची चौकशी करतीन, अधिकाऱ्याच्या हाती सोपून देतीन, तवा तुमी पयलेस काळजी करू नका, कि आमी काय बोलू, पण जे काई तुमाले बोला लागीन ते तुमाले तवा जे काई देव तुमाले म्हणीन, तेच बोल्याचं, कारण कि तवा बोलणारे तुमी नाई पण पवित्र आत्मा राईन. 12अन् लोकं आपल्या भाऊ अन् बहिणी सोबत विश्वासघात करतीन, कावून कि ते माह्यावाला अनुसरण करते, माय-बाप आपल्या लेकराय सोबत असचं करतीन, लेकरं आपल्या माय-बापाचा विरोध करतीन अन् त्यायले मारून टाकायचा कारण होतीन. 13अन् माह्यावर विश्वास केल्याने तवा लोकं तुमचा राग करतीन, पण जे आखरी परेंत धीरज ठेवतीन, अन् पृथ्वीवर मरेपरेंत माह्या मांग चालतीन तो पापाच्या सजे पासून देवाच्या व्दारे वाचवल्या जाईन.”
(मत्तय 24:15-28; लूका 21:20-24)
14“पण जवा तुमी एक दिवस एक खूप बेकार माणूस यरुशलेमच्या देवळात उभा असलेला पायसान, जती तो अशाले नाई पायजे, कावून कि या देवळाले सगळ्या लोकायन त्यागले पायजे, मंग यहुदीया प्रांताच्या लोकायले लपायसाठी एका पाहाडावर पयावे लागीन, कावून कि ते मारले नाई जावे. 15जो घराच्या माळ्यावर अशीन त्यानं खाली उतरू नये, अन् आपल्या घरात पण काई घ्यायले जाऊ नये. 16अन् कोणी वावरात असतांना, त्यानं आपले कपडे घ्यायले, घरी वापस जावावं नाई
17त्या दिवसात जे गर्भवती, अन् दुध पाजणाऱ्या बाया असतीन त्यांची अवस्था लय भयंकर होईन कावून कि त्यायच्यासाठी पयनं लय कठीण राईन. 18-19कावून कि त्यावाक्ती, लय तरास होईन, लोकायन कधीही अशा संकटाचा सामना नाई केला, जवा पासून देवानं जग बनवलं, म्हणून प्रार्थना करा, कि ही अशी कठीण वेळ हिवाळ्यात नाई व्हावी, जवा प्रवास करणे कठीण असते. 20अन् जर ते दिवस देवानं कम केले नसते तर कोणताच प्राणी वाचला नसता, पण देवानं आपल्या निवडलेल्या लोकायसाठी ज्याले त्यानं निवडलं ते दिवस कम केले.
21त्या दिवसात जर कोण तुमाले म्हतलं, कि पाहा ख्रिस्त अती हाय, नाई तर पाहा तती हाय, तर खरं मानू नका. 22कावून कि खोटे ख्रिस्त, अन् खोटे भविष्यवक्ता येतीन, अन् मोठं-मोठे चमत्कार अन् अद्भभुत कामे दाखवतीन, अन् निवळलेल्या विश्वासी लोकायले पण भ्रमात पाडतीन. 23पण तुमी सावधान राहा, पाहा मी तुमाले ह्या सगळ्या गोष्टी पयलेच सांगून ठेवतो हाय.”
माणसाच्या पोराचं येणं
(मत्तय 24:29-31; लूका 21:25-28)
24“त्या दिवसात हे दुख संकट येऊन गेल्यावर, मंग सुर्य अंधारमय होईन, अन् चंद्र ऊजीळ देणार नाई. 25अभायातून तारे पडतीन, अन् अभायातल्या ताकती#13:25 अभायातल्या ताकती हे वाक्य होऊ शकते अभायातल्या दुसऱ्या प्रकाशाले दाखवते, तसेच खराब आत्मेले पण दाखवते. हालून जाईन. 26तवा लोकं मले पायतीन, की माणसाचा पोरगा लय पराक्रमान व सामर्थ्यान गौरवाच्या संग ढगाइत येत हाय. 27त्या वेळेवर तो आपल्या देवदूताले पाठवून पृथ्वीवरच्या सीमेपासून तर अभायाच्या सीमेपरेन्त चारही दिशाईतून आपल्या निवळलेल्या लोकायले जमा करीन.”
अंजीराच्या झाडाची गोष्ट
(मत्तय 24:32-35; लूका 21:29-33)
28“अन् आता अंजीराच्या झाडाच्या कथेऊन शिका, जवा त्या झाडाच्या डांगा कवळ्या होतात, अन् त्याच्यातून कोम निघून, फांद्यातून पत्ते निगु लागतात, तवा तुमाले मालूम होते कि ऊनाया जवळ आला असं तुमी समजता. 29या सारखच जवा तुमी ह्या गोष्टीले होतान पायसान तर जानसाल कि जगाचा शेवट जवळ आला हाय अन् मी, देवाचा पोरगा येत हाय. 30मी तुमाले खरं-खरं सांगतो की जतपरेंत हे पूर होणार नाई ततपरेंत ह्या पीडीचे काई लोकं मरतीन नाई. 31अभायाचा व पृथ्वीचा नाश होईन, पण माह्य वचन कधीच पूर्ण झाल्या शिवाय रायणार नाई.”
जागे राहा
(मत्तय 24:36-44)
32“अन् ह्या गोष्टी कोणत्या वेळी अन् कोणत्या दिवसात होतीन हे कोणालेच माहीत नाई, देवदूताले पण मालूम नाई, देवाच्या पोराले पण मालूम नाई, फक्त स्वर्गातल्या देवबापालेच मालूम हाय. 33पाहा जागी रा, अन् प्रार्थना करत राहा, कावून कि तुमी नाई जानसाल कि तो वेळ कधी येणार, जवा मी वापस येईन. 34हे त्या माणसा सारखी दशा हाय, ज्यानं दुसऱ्या देशात जातांना आपलं घर सोडून देलं अन् आपल्या नवकरायले अधिकार देला, अन् हरेकाले आपलं काम देऊन गेला, अन् चौकीदाराले जागी रायाची आज्ञा देली.
35म्हणून येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, जागी राहा कारण कि घरधनी कधी येईन, संध्याकाळी, नाई तर अर्ध्याराती, नाई तन कोंबड्याच्या बाग देयाच्या वाक्ती, नाई तर सकाळी येईन. 36असं नाई झालं पायजे कि तो अचानक येऊन तुमाले झोपीत असतांना पाहावं. 37अन् जे मी तुमाले सांगतो, तेच सर्व्यायले सांगतो, कि मी येणार हाय म्हणून तयार राहा.”

Currently Selected:

मरकुस 13: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in