YouVersion Logo
Search Icon

मरकुस 4

4
बिया पेरनाऱ्याची गोष्ट
(मत्तय 13:1-9; लूका 8:4-8)
1काई दिवसानंतर येशू परत गालील समुद्राच्या काटावर देवाच वचन सांगत होता, अन् येवडे लोकं त्याच्यापासी जमा झाले की तो समुद्रात एका डोंग्यावर जावून बसला अन् सगळे लोकं जमिनीवर समुद्र काटावर उभे होते. 2अन् येशू त्यायले कथेतून खूप साऱ्या गोष्टी शिकवू लागला, अन् आपल्या उपदेशातून त्यायले म्हतलं 3#4:3 पाहा, “आयका, एक शेतकरी आपल्या वावरात बिया पेरणी करायला निघाला.
4अन् तो पेरत असतांना, असं झालं कि काही बिया रस्त्याच्या किनाऱ्यावर पडल्या, अन् ते पाखराईन येऊन खाऊन टाकल्या. 5-6अन् काई बिया खडकावर पडल्या, तती त्यायले नरम माती नाई मिळाल्यानं, ते लवकर उगयले, जवा सूर्य निघाला अन् सुर्याची गर्मी वाढल्यावर ते, झाड जळून गेले, कावून की त्याची मुयी जमिनीत खोल गेलती नव्हती.
7अन् काई बिया अशा जागी पडल्या जती काटेरी झाड उगवले होते, पण काटेरी झाडाच्याने ते वाढू शकले नाई, त्यामुळे त्यायले काईच पीकं आले नाई. 8अन् काई बिया चांगल्या काळ्या मातीवर पडल्या, अन् ते झाड चांगले उगवले व मोठेहुन काई झाडायले तीसपट, काईले साठपट, काईले शंभरपट पीकं आले.” 9अन् मंग येशूनं त्यायले म्हतलं कि, “ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा”
गोष्टीले समजाऊन सांगते
(मत्तय 13:10-17; लूका 8:9-10)
10जवा येशू एकटा होता, तवा त्याच्या संगच्या बारा शिष्याईन, व दुसऱ्या काई लोकायन येऊन या कथेच्या विषयी त्याले विचारलं 11येशूनं त्यायले म्हतलं, “तुमाले तर देवाच्या राज्याच रहस्य, समजून घ्यायची समज देली हाय, पण जे लोकं माह्यावर विश्वास नाई करत त्यायच्यासाठी हे सगळ्या गोष्टी कथेतुनच सांगतल्या जातात” 12हे याच्यासाठी कि, “पवित्रशास्त्राच वचन पूर व्हावं.
ते दररोज पायतं असतीन पण त्यायले स्पष्ट दिसीन नाई,
ते दररोज आयकतं असतीन, पण त्यायले नाई समजीन,
व असं नाई झालं पायजे कि ते समजावं व त्यायनं आपलं मन फिरवाव, व त्यायले क्षमा केल्या जावं.” (यश. 6:9, 10, यिर्म. 5:21.)
बिया पेरनाऱ्याची गोष्ट समजाऊन सांगणे
(मत्तय 13:18-23; लूका 8:11-15)
13तवा येशूनं त्यायले म्हतलं, “की जर तुमाले हे कथा समजली नाई तर अजून सगळ्या कथा कशा समजतीन? 14एक शेतकरी बिया पेरतो जे कोणाच्या व्दारे वचनाचा प्रचार केल्या जाण्याले दाखवते. 15काई लोकं त्या रस्त्या सारखे हायत, ज्याच्यावर बिया पळल्या, जवा ते लोकं देवाच वचन आयकतात, तवा सैतान पटकन येते, अन् त्यायले ह्या सगळ्या गोष्टी भुलवून टाकते.
16अन् काई लोकं असे हायत ज्याची बरोबरी त्या बिया सोबत केली जाऊ शकते, ज्या खळखाळ जमिनीत पडल्या, हे लोकं देवाच्या वचनाले आयकून पटकन स्वीकार करतात. 17पण ते देवाच्या वचनाले आपल्या मनात मुया पर्यंत वाढू देत नाई, व काई दिवसानं वचनाच्यान त्यायच्यावर संकट किंवा सताव होते, तवा ते लवकरच नाराज होऊन जातात. 18काई बिया काटेरी झाडावर पडल्या, अशा लोकायची बरोबरी काट्याच्या झाडाय बरोबर केली हाय, जवा ते देवाच वचन आयकतात.
19अन् त्यायले संसाराची कायजी असते व पैशावर अधिक प्रेम अन् अलग-अलग वस्तुची आवड त्यायच्या जीवनात येते, अन् देवाच्या वचनात अडथळा आणते, अन् त्याच्या जीवनात फळ येत नाई. 20अन् चांगल्या काळ्या मातीत पेरलेल्या बिया अशा हाय, जे लोकं देवाच वचन आयकून स्विकारतात मंग त्यायच्या जीवनात चांगले परिणाम येते, कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे फळ आणते”
देवाची गोष्ट
(लूका 8:16-18)
21तवा येशूनं त्यायले अजून एक कथा सांगतली, “कि कोणी दिवा लावून बाजी खाली ठेवत नाई, पण दिव्याले टेबलावर ठेवतात, कावून की त्याचा ऊजीळ सगळ्या इकडे पळला पायजे. 22असचं जे काई लपलेलं हाय ते दिसून येईन अन् सगळं लपवलेली गोष्ट दाखवल्या जाईन. 23तवा येशूनं म्हतलं, ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा”
24मंग येशूनं त्यायले म्हतलं, “कि तुमी जे आयकता त्याविषयी हुशार राहा, ज्या मापान तुमी मापसान त्याचं मापान तुमच्यासाठी मापल्या जाईन, अन् तुमाले अजून देल्या जाईन. 25कावून की, ज्याच्यापासी देवाच्या वचनाच ज्ञान हाय, त्याले अजून दिल्या जाईन अन् ज्याच्यापासी नाई हाय, जे काई त्याच्यापासी अशीन ते पण वापस घेतल्या जाईन.”
उगनाऱ्या बियाची गोष्ट
26मंग येशूनं म्हतलं, “कि देवाच राज्य असं हाय, कि जसा कोणता शेतकरी एका वावरात बिया टाकतो. 27अन् शेतकऱ्याने त्या इकळे ध्यान देले नाई, अन् आपले रोजचे काम करत रायला, पण त्यानं टाकलेलं बियाले कोम आले व ते मोठे झाले पण त्याले मालूम नाई होतं, की ते कसे काय मोठं झालं.
28तसचं पृथ्वीवर आपोआपचं पीकं येते, पहिले अंकुर, मंग कणूस, मंग, कंनसात भरलेला दाना. 29नंतर दाना पिक्ल्यावर शेतकरी येऊन त्याले इव्हा लावतो अन् कापतो. कावून कि कापण्याची वेळ झाली हाय.”
मवरीच्या दाण्याची गोष्ट
(मत्तय 13:21,32,34; लूका 13:18-19)
30मंग येशूनं म्हतलं, “कि मी तुमाले एक कथा सांगतो, हे दाखव्याले की, देवाच राज्य कसं हाय, 31ते मवरीच्या दाण्यासारखं हाय, जवा तो जमिनीत पेरतात, तवा तो सगळ्या बिया पेक्षा लहान व बारीक असते. 32ज्यावाक्ती ते बिया जमिनीत पेरल्या जातात तवा ते उगयतात, अन् ते सगळ्या रोपामध्ये मोठे होते. अन् त्याले एवढ्या फांद्या फुटतात की अभायातले पाखरं, येऊन त्याच्या सावलीत रायतात व घर बनवतात.”
33अन् येशू अश्या प्रकारे बऱ्याचं कथा सांगून, लोकायले देवाच्या बाऱ्यात सांगत होता, जेणे करून ते देवाचे वचन समजू शकले पायजे, 34अन् जे पण येशूने देवाच्या बाऱ्यात सांगतले, त्यासाठी त्याने कथेचा उपयोग केला, पण एकांतात जाऊन आपल्या बारा शिष्यांना सगळ्या कथेचा अर्थ सांगत होता.
येशू वारावायद्णाले शांत करतो
(मत्तय 8:23-27; लूका 8:22-25)
35अन् त्याचं दिवशी संध्याकाळच्या पायरी, येशूने शिष्यांना म्हतलं कि “चला आपण गालील समुद्राच्या तिकळच्या बाजूनं जाऊ.” 36शिष्य पण लोकायच्या गर्दीले सोडून त्याचं डोंग्यात येशूच्या संग चालले गेले ज्यात येशू बसला होता त्यायच्या सोबत आणखी पण डोंगे होते. 37अन् मंग समुद्रात लय वारावायद्न सुरु झाले, अन् लाटा डोंग्यावर आल्या, अन् पाणी पण डोंग्यात येऊन रायलं होते, अन् तो डोंगा डुबून रायला होता.
38अन् येशू डोंग्याच्या खालच्या भागात झोपला होता, अन् शिष्यायने त्याले उठऊन असं म्हतलं, कि गुरुजी आता डोंगा डूबत हाय, आपण पण डुबून जाऊ काय तुमाले कायजी नाई काय? 39तवा येशूनं उठून वारावायद्णाले दटाऊन म्हतलं “शांत राय! थांबून जाय!” तवा वारावायद् थांबले! अन् सर्व वातावरण शांत झालं,
40तवा त्यानं त्यायले म्हतलं कि “तुमी कायले भेले, काय तुमचा आतापर्यंत विश्वास नाई?” 41तवा ते लय भेले, अन् एकमेकाय संग बोलू लागले, कि हा कोण हाय, की वारावायद्न अन् समुद्र पण त्याची आज्ञा मानते?

Currently Selected:

मरकुस 4: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in