योहान 4

4
येशु आणि सामरी बाई
1मंग जव येशु ले माहित होयन कि परूशी लोकस्नी आयकेल शे कि येशु योहान बाप्तिस्मा देणारा पेक्षा जास्त शिष्य बनावस आणि तेस्ले बाप्तिस्मा देस. 2तरी येशु स्वता नयी पण तेना शिष्य बाप्तिस्मा देत होता, 3तव येशु यहूदीया प्रांत ले सोळीसन आपला शिष्यस संगे गालील जिल्हा मा परत चालना गया, 4तेले शोमरोन प्रांत कळून जावाना अवश्य होत. 5तो शोमरोन प्रांत मा स्थित सुखार शहर मा उना, जे त्या जमीन ना जोळे शे जेले याकोब नि आपला पोऱ्या योसेफ ले दियेल होता. 6याकोब नि जी हेर खोदेल होता ती हेर आते बी तठेच होती. हवू दुफार ना टाईम होता आणि येशु चालता-चालता थकि जायेल होता एनासाठे तो ती हेर जोळे बठी ग्या. 7इतला मा शोमरोन प्रांत नि एक बाई पाणी भराले उणी. येशु नि तिले सांग, “मले पाणी पाज.” 8त्या टाईम ले येशु ना शिष्य नगर मा जेवण विकत लेवा साठे जायेल होतात. 9ती शोमरोनी बाई नि तेले सांग, “तू यहुदी शे, आणि मी एक शोमरोनी बाई शे. तुमी मना कळून पाणी काब मांगी ऱ्हायनत?” 10येशु नि उत्तर दिधा, “तुले माहित नई कि परमेश्वर तुले काय देवानी ईच्छा करस आणि नईत हई माहित शे कि जो तुना कळून पाणी मांगस तो कोण शे, जर तुले माहित ऱ्हात, तर तू मना कळून मांगती आणि मी तुले ते पाणी देतु जे जीवन देस.” 11तिनी येशु ले सांग, “हे गुरुजी, तुना कळे पाणी भरा साठे तर काही बी नई शे आणि हेर गैरा खोल शे. त मंग ते जीवन ना पाणी तुना कडे कथाईन उना. 12काय तो आमना पूर्वज याकोब तून मोठा शे, जेनी हय हेर आमले दियेल शे तो आणि तेनी पोर आणि तेना ढोर संगे तेना मधून पिनत?” 13येशु नि तिले उत्तर दिधा, “जो कोणी हय पाणी पिन तेले परत तहान लागीन, 14पण जो कोणी त्या पाणी मधून पिन जे मी तेले देसू मंग तेले कायम लोंग तहान लागाव नई. पण जे पाणी जेले मी दिसू तो तेनामा एक झरा बनी जाईन जो तेस्ले जीवन देणारा पाणी दिन आणि तेस्ले कायम ना जीवन दिन.” 15बाई नि तेले सांग, “हे प्रभु, ते पाणी मले दे कि मी तहानेल नई होवू आणि नईत इतला दूर पाणी भराले येवू,” 16येशु नि तिले सांग, “जा, आपला नावराले बलायी लय.” 17बाईंनी उत्तर दिधा, “मी बिगर नवरानी शे.” येशु नि तले सांग, “तू खर सांगस, कि मी बिगर नवरानी शे. 18कारण कि तू पयलेच पाच नवरास संगे ऱ्हायी लीयेल शे, आणि तो माणुस जेना संगे तू आते शे तो बी तुना नवरा नई, हई तू खर सांगेल शे.” 19बाई नि तेले सांग, “हे प्रभु, मले वाटस कि तू भविष्यवक्ता शे. 20आमना शोमरोन पूर्वज याच डोंगर वर परमेश्वर नि उपासना करणात, आणि तुमी यहुदी लोक सांगतस कि ती जागा जठे उपासना कराले पायजे ती यरूशलेम शहर मा शे.” 21येशु नि तेस्ले सांग, “हे बाई, मना गोष्ट नि विश्वास कर कि तो टाईम येस कि तुमी नईत या डोंगर वर परमेश्वर बाप नि उपासना करशात, नईत यरूशलेम शहर मा. 22तुमी शोमरोन लोक जेले नई ओळखत तेनी उपासना करतस आणि आमी जेले नई ओयखतस, तेनी उपासना करतस, आणि आमी यहुदी लोक जेले ओयखतस, तेनी उपासना करतस, कारण तारण यहुदी लोकस्ना मधून शे. 23पण तो टाईम येस, आणि आते बी शे, जेनामा खरा भक्त परमेश्वर बाप नि उपासना आत्मा आणि खरेपण कण करीन, कारण बाप आपला असाच उपासना करणारस्ले झामलस. 24परमेश्वर आत्मा शे, एनासाठे अवश्य शे कि तेनी उपासना करणारा आत्मा आणि खरेपणातून उपासना करा.” 25बाई नि तेले सांग, “मले माहित शे कि मसिह जेले ख्रिस्त म्हणतस, येणारा शे, जव तो ईन, तव सर्वा गोष्टी आमले सांगी दिन.” 26येशु नि तिले सांग, “मी जे तुले सांगस, तोच शे.”
शिष्यस्न परत येन
27इतला मा तेना शिष्य इग्यात, आणि आश्चर्य करू लागणत कि तो बाई शी बोली ऱ्हायंना, तरी बी कोणी नई विचारन, “कि तुनी काय ईच्छा” व “कसा साठे तीना बरोबर बोलस?” 28तव बाई आपला घडा सोळीसन नगर मा चालनी गई, आणि लोकस्ले सांगू लागणी, 29“या, एक माणुस ले देखा, जेनी गैर काही जे मी करेल होती सांगी दिधा. कदाचित हवू त ख्रिस्त नई शे.” 30तव नगर मधून गैरा लोक निघीसन येशु ले देखाले येवू लागणत. 31इतला मा तेना शिष्य येशु ले हई विनंती करू लागणत, “हे गुरु, काही खाईल्या.” 32पण तेनी तेस्ले सांग, “मना कळे खावाले असा जेवण शे जे तुमले माहित नई शे.” 33तव शिष्यस्नी आपस मा सांगनत, “काय कोणी आखो तेना साठे खावाले आनेल शे.?” 34येशु नि तेस्ले सांग, “मना जेवण त्या परमेश्वर नि ईच्छा नि पायन करन शे जेनी मले धाळेल शे. आणि त्या काम ले पूर्ण करान शे जे मले सोपेल शे. 35काय तुमी नई सांगतस कि, कापणी करासाठे आजून चार मयना पळेल शे? मी तुमले सांगस, आपला डोया उघाडीसन येणारा लोकस्ले देखा, कि त्या एक वावर सारखा शे ज्या कापणी साठे तयार शे. 36कापणारा मजुरी ली ऱ्हायनात. आणि कायम ना जीवन साठे फय एकत्र करी ऱ्हायना. कि पेरणारा आणि कापणारा दोनी एकत्र हुईसन आनंद करोत. 37कारण कि येनावर हई गोष्ट चांगली बठस, पेरणारा कोणी दुसरा शे आणि कापणारा कोणी दुसरा. 38मनी तुमले ते वावर कापाले धाळनु जेनावर तुमी काम नई करणत दुसरास्नी काम कर आणि तुमी त्या पिक ले एकत्र करशात जेस्ना साठे तेस्नी काम करेल शे.”
सामरीयास्ना विश्वास करान
39त्या नगर मधना गैरा शोमरोनी लोक त्या बाई ना सांगा वरून येशु वर विश्वास करणात, जेनी हई सांगेल शे, कि तेनी सगळ काही जे मनी करेल शे, मले सांगी टाक. 40तव शोमरोनी लोक तेना जोळे उनात, त तेले विनंती करू लागनात कि आमना आठे ऱ्हाय. एनासाठे तो तठे दोन दिन लोंग ऱ्हायना. 41येशु ना संदेश ले आयकीसन आजून बी गैरास्नी तेनावर विश्वास करणात. 42तेस्नी त्या बाई ले सांगणात, “आते आमी तुमना सांगावर विश्वास नई करतस. कारण कि आमी स्वताच आयकेल शे, आणि समजी ग्यात कि हवूच खरोखर जग ना लोकस्ले वाचाळनारा शे, ख्रिस्त शे.” 43मंग तो त्या दोन दिन नंतर तो तठून निघीसन गालील जिल्हा मा ग्या. 44कारण येशु नि स्वता साक्ष दियेल होता, कि भविष्यवक्ता ले आपला देश मा आदर नई भेटस. 45जव तो गालील जिल्हा मा उना, त गालील जिल्हा ना लोक आनंद मा तले भेटनत. कारण जीतला काम तेनी यरूशलेम शहर मा वाल्हांडण ना सन ना टाईम ले करेल होता तेस्नी ते सगळ देखेल होत, कारण त्या बी सन मा जायेल होता.
कर्मचारी ना पोऱ्या ले बर करन
46तव आखो तो गालील जिल्हा ना काना नगर मा उना, जठे तेनी पाणी ले द्राक्षरस बनायेल होता. तठे राजा ना एक कर्मचारी होता जेना पोऱ्या कफर्णहूम नगर मा आजारी होता. 47तो हई आयकीसन कि येशु यहूदीया प्रांत मधून गालील जिल्हा मा इजाएल शे, तेना कळे गया, आणि तेले विनंती करू लागणा कि चालीसन मना पोऱ्या ले बरा करी दे, कारण तो मरणार होता. 48येशु नि तेले सांग, “जठलोंग तुमी चिन्ह आणि चमत्कार नई देखतस तठलोंग कदीच मनावर ख्रिस्त ना रूप मा विश्वास नई कराव.” 49राजा ना कर्मचारीनी तेले सांग, “हे प्रभु, मना पोऱ्या ले मराणा पयले चाल.” 50येशु नि तेले सांग, “जा, तुना पोऱ्या जित्ता शे.” त्या माणुस नि येशु नि सांगेल गोष्टी वर विश्वास करना आणि चालना ग्या. 51तो रस्ता वर चालत होता, कि तेना दास ईसन भेटनात आणि सांगू लागणत, “तुना पोऱ्या जित्ता शे.” 52तेनी तेस्ले विचार, “कोणता टाईम ले तो चांगला होवू लागणा?” तेस्नी तेस्ले सांग, “कालदिन दुफार ना एक वाजता तेना ज्वर उतरी ग्या.” 53तव बाप ले माहित पडण कि हई त्याच टाईम ले होयन ज्या टाईम ले येशु नि तेले सांग, “तुना पोऱ्या जित्ता शे.” आणि तो आणि तेना पूर्ण घरणानी येशु वर विश्वास करणात. 54हई दुसरा चमत्कारी चिन्ह होत जे येशु नि यहूदीया प्रांत तून गालील जिल्हा मा परत ईसन दाखाळणा.

S'ha seleccionat:

योहान 4: AHRNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió