मरकुस 3

3
लुल्या हातवाल्या माणसाले बरं करणे
(मत्तय 12:9-14; लूका 6:6-11)
1अन् येशू अजून धार्मिक सभास्थानात गेला, तती एक माणूस होता जो लुल्या हाताचा होता. 2तवा काई परुशी लोकं येशूच्या चुका काढ्याचा प्रयत्न करत होते, म्हणून ते त्याले ध्यान देऊन पायत होते, की तो आरामाच्या दिवशी त्याले चांगलं करते की नाई. 3अन् येशूनं त्या लुल्या हाताच्या माणसाले सांगतल कि, “सगळ्या लोकायच्या मधात उभा राहा, की लोकायन तुले पायलं पायजे.”
4अन् येशूनं त्यायले विचारलं कि “आरामाच्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्रानुसार लोकायले चांगलं करन या बेकार करन या जीव वाचवन या मारन यातून चांगलं कोणत हाय?” तवा ते चूप रायले. 5जवा येशूनं चवभवंताल पाह्यलं त्याले राग आला, येशू लय नाराज होता, कावून की ते लोकं येशूच्या गोष्टीले मानत नाई होते. येशूनं त्या माणसाला म्हतलं, “तुह्या हात समोर कर” अन् तवा त्यानं हात समोर केला, अन् तवाचं त्याचा हात बरा झाला. 6मंग परुशी लोकं सभास्थानातून बायर जाऊन लवकरच हेरोद राजाचे समर्थन करणारे लोकायसोबत मिळून सल्ला करू लागले, की येशूले कसं मारावं.
येशूचा मांग लय गर्दी होती
7येशू लोकायपासून दूर आपल्या शिष्यासोबत गालील समुद्राच्या जवळ गेला, तवा गालील प्रांतातले लोकायची मोठी गर्दी त्याच्यापासी आली अन् यहुदीया प्रांतातले. 8यरुशलेम शहरातले, इदोम शहरातले, अन् यरदन नदीच्या तिकळल्या प्रांत सूर व सैदा नगराच्या जवळ पासची लय लोकं हे आयकून की तो कसे चमत्काराचे काम करते, ते पावून त्याच्या जवळ आले.
9मंग येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, “अती गर्दीच्यानं माह्यासाठी एक डोंगा तयार ठेवा, की लोकायच्याने मी दबलो नाई पायजे.” 10कावून कि येशूनं लय बिमारायले बरे केले होतं म्हणून जे लोकं बिमार होते ते सगळे येशूले हात लाव्याले पायत होते.
11जवा भुत आत्मे लागलेले लोकं येशूले पायतं होते तवा ते त्याले आदर द्यायले त्याच्या पाया लागून जोऱ्यानं कल्ला करून म्हणत, होता कि, “तू देवाचा पोरगा हायस.” 12अन् येशू त्यायले दटाऊन सांगत होता की, “कोणाले ही सांगू नका की मी देवाचा पोरगा हाय.”
बारा प्रेषितांची निवड
(मत्तय 10:1-4; लूका 6:12-16)
13-14या नंतर येशू जवळच्या एका पहाडावर गेला, त्यानं त्या माणसायले आपल्यापासी बलावले ज्याईले त्यानं आपले प्रेषित होयाले बलावले होते. अन् ते गर्दीतून त्याच्यापासी आले. 15अन् येशूनं शिष्यायले भुत काढ्याचा अधिकार देला. 16अन् ते हे बारा शिष्य हायत, ज्याईले येशूनं निवडलं, शिमोन ज्याचं नाव त्यानं पतरस ठेवलं
17जब्दीचा पोरगा याकोब, व याकोबाचा भाऊ योहान, याले त्यानं बेनेरे-गेश म्हणजे गर्जनेचा पोरगा हे नाव दिलं. 18अन् आंद्रियास, फिलिप्पुस, बरत्तूल्मे, मत्तय, थोमा, हल्फई पोरगा याकोब, तद्दै, शिमोन जो कनानी (देशभक्त) होता, 19अन् यहुदा इस्कोरोती ज्यानं येशूले वैऱ्याच्या हाती धरून देलं होतं.
येशू अन् सैतान
(मत्तय 12:22-32; लूका 11:14-23; 12:10)
20जवा येशू आपल्या शिष्याय संग आपल्या घरी आला, तवा एवढे लोकं त्याच्या जवळ जमा झाले कि त्याले भाकर खायाले पण वेळ भेटली नाई. 21जवा येशूच्या घरातल्या लोकायन त्याच्या कामाच्या बाऱ्यात आयकलं, तवा ते येशूले घरी जबरदस्ती धरून नियाले आले, कावून कि ते म्हणत जात कि याचं डोक्स जाग्यावर नाई.
22अन् यरुशलेम शहरातून मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक तती आले होते. अन् ते असं म्हणत होते, कि “त्याच्यात सैतान हाय,” व “तो भुत आत्म्याच्या सरदार, सैतानाच्या ताकतीने भुतायले काळतो.” 23म्हणून येशूनं त्यायले आपल्या जवळ बलाऊन त्यायले कथा सांगून रायला होता, “की पक्यातच सैतान आपल्या भुत आत्म्याईले काढू शकत नाई.”
24“जर एका देशातले लोकं आपल्यातच भांडन करतीन तर तो देश ज्यादा दिवस रायणार नाई.” 25तसचं जर एकाच घरातले लोकं, एकामेकाच्या विरोधात असले तर त्या घरातले लोकं एकत्र राऊ शकत नाई. 26अन् जर सैतान आपल्याचं विरोधात होईन अन् आपल्याचं विरोधात भांडन करीन तर तो स्वताचाच नाश करीन.
27“अती येशूनं सैतानची तुलना एका ताकतवान माणसाबरोबर केली, ज्याच्यापासी एक घर हाय, जर त्याचं घर लुट्याच अशीन तर त्याचे पयले हात पाय बांधा लागीन तवाचं तो त्याच्या घरात जाऊ शकते, अन् त्याचं सगळं घर लुटू शकते.” 28“मी तुमाले खरं सांगतो कि माणसाचे सगळे पाप अन् निंदा जो करते त्याले क्षमा केले जाईन. 29पण जर कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्धात निंदा करीन त्याचे पाप देव कईच क्षमा करणार नाई, अन् देवबाप या पापासाठी त्या माणसाले नेहमी साठी दोषी मानणार.” 30कावून की, त्याले असे म्हणत कि त्याले भुत आत्मा लागली हाय.
येशूची माय अन् भाऊ
(मत्तय 12:46-50; लूका 8:19-21)
31नंतर येशूची माय अन् त्याचे भाऊ तती आले, अन् बायरून निरोप पाठून त्यायनं त्याले बलावलं. 32येशूच्या आजूबाजून लय लोकं बसले होते, काई लोकायन येऊन त्याले म्हतलं, कि “तुमची माय, व लायना भाऊ बायर तुमचा शोध करून रायले हाय.” 33-34येशूनं त्यायले उत्तर देलं “माह्यी माय, अन् भाऊ, कोण हाय?” तवा जे लोकं त्याच्या आजू बाजुले बसले होते त्यायच्या इकडे पावून तो म्हणाला, हेच “माह्यी माय अन् भाऊ हाय. 35कावून की जे कोणी लोकं देवाचा इच्छेप्रमाणे वागतात व चालतात, तेच माह्ये भाऊ, बहिण, व माय, हाय.”

S'ha seleccionat:

मरकुस 3: VAHNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió