मरकुस 8

8
चार हजार लोकायले जेवण
(मत्तय 15:32-39)
1एका दिवशी, येशू जवा दिकापुलिस प्रांतात होता, तवा वापस एकडाव लोकायची मोठी गर्दी जमली होती, अन् त्यायच्यापासी खायाले काई नाई होते, तवा येशूनं आपल्यापासी शिष्यायले बलावून त्यायले म्हतलं, 2“मले या लोकायवर दया येते, कावून कि ते माह्या बरोबर तीन दिवसापासून हायत अन् त्यायच्यापासी खायाले काई नाई. 3म्हणून मी त्यायले उपासी घरी पाठून देले तर ते, रस्त्यान गयाट्टीनं कावून कि त्यायच्यातलें काई-काई जन लय दुरून आले हाय.”
4त्याच्या शिष्यायनं त्याले म्हतलं, “अती सुनसान जागी येवढ्या भाकरी कुठून आणायच्या की हे लोकं खाऊन तृप्त हो.” 5येशूनं शिष्यायले विचारलं, “तुमच्यापासी कितीक भाकरी हायत, त्यायनं येशूले सांगतल की सात भाकरी हायत.” 6तवा येशूने लोकायले खाली जमिनीवर बशाले सांगतल, अन् त्या सात भाकरी घेऊन देवाले धन्यवाद केला, त्या मोडल्या अन् त्यानं आपल्या शिष्यायपासी देवून वाढ्याले सांगतल्या त्यायनं त्या लोकायले वाढल्या.
7त्यायच्यापासी उलच्याक लायण्या मासोया पण होत्या त्या पण येशूनं देवाले धन्यवाद देऊन शिष्यायले वाढ्याले सांगतल्या. 8ते लोकं जेवून करून समाधान झाले व शिष्यायनं उरलेल्या भाकरीच्या सात टोपल्या भरून उचलल्या. 9तती जवळपास चार हजार लोकं होते. तवा येशूनं त्यायले निरोप देला. 10मंग तो लवकरच आपल्या शिष्याय संग डोंग्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला.
परुशी पासून स्वर्गातल्या चिंन्हाची मांग
(मत्तय 16:1-4)
11परुशी लोकं येशू पासी येवून, वादविवाद करू लागले अन् ते येशूले फसव्यासाठी त्याच्यापासी आले, अन् त्याले स्वर्गातल्या चिन्ह चमत्काराची मांग केली. 12तवा येशूनं आपल्या आत्म्यात निराश होऊन त्यायले म्हतलं, “ह्या पिढ्यातल्या लोकायन चमत्कार नाई मांग्याले पायजे, मी तुमाले खरं-खरं सांगतो कि ह्या पिढीले चमत्कार मुळींच देलं जाणार नाई.” 13मंग तो त्यायले सोडून परत डोंग्यात बसून गालील समुद्राच्या तिकळल्या बाजुले शिष्याय संग गेला.
फुरुश्यांचे अन् हेरोदाचे शिकवण
(मत्तय 16:5-12)
14येशूचे शिष्य सोबत भाकरी घ्यायले भुलले होते, अन् त्यायच्यापासी डोंग्यात एकच भाकर होती. 15मंग येशूनं त्यायले चेताऊन सांगतल की “पायजा, परुशी लोकायचे शिकवण अन् हेरोद राजाचे शिकवण, ह्या विषयी हुशारकीनं राहा.” 16तवा ते आपआपसात विचार करून म्हणाले, “आपल्यापासी जास्त तर भाकरी नाई हायत.” 17हे पावून येशूनं त्यायले म्हतलं, “तुमच्यापासी भाकरी नाई हाय, ह्या बद्दल कायले विचार करता, तुमाले अजून लक्षात नाई हाय काय, तुमचं मन एवढे कठोर कावून झालं?
18डोये असून पण तुमाले दिसत नाई कि काय? व कान असून पण तुमाले आयकू येतं नाई काय? काय तुमाले आठोन नायी हाय? 19मी जवा पाच हजार लोकायले पाच भाकरी मोडून वाटून देल्या, तवा तुमी किती भाकरीच्या टोपल्या भरून घेतल्या?” त्यायनं येशूले म्हतलं, “बारा भाकरीच्या टोपल्या.” 20“तसचं चार हजार लोकायले सात भाकऱ्या होत्या तवा किती टोपल्या भाकरी भरून घेतल्या” त्यायनं म्हतलं सात टोपल्या. 21तवा येशूनं त्यायले म्हतलं “तुमाले अजून पण नाई समजलं की मी कोण हाय?”
बेथसैदा एका फुटक्याले बरं करणे
22मंग येशू अन् त्याचे शिष्य बेथसैदा शहरात आले, तवा लोकायन त्याच्यापासी एका फुटक्याले आणलं व येशूले विनंती केली की त्याले बरं करावं 23तवा येशूनं त्या फुटक्याचा हात धरून त्याले गावाबायर नेऊन अन् त्याच्या डोयावर थूका लाऊन त्याच्यावर हात ठेवले, अन् त्याले विचारलं “तुले काई दिसते?” 24तो वर पाऊन म्हणलां, “मले माणसं दिसून रायले हाय, पण चांगल्यान नाई, ते झाडा सारखे चालतांना दिसू रायले हाय.” 25अजून येशूनं त्याच्या डोयावर हात ठेवला, तवा त्यानं निरखून पायलं अन् तो चांगला झाला, त्याले सगळे काई डोयान चकं दिसू लागलं. 26मंग येशूनं त्याले घरी पाठवतानां सांगतल कि “या गावातल्या लोकायले हे सांगायले वापस गावात येऊ नको.”
पतरस येशूले ख्रिस्त म्हणून स्वीकार करते
(मत्तय 6:13-20; लूका 9:18-21)
27मंग येशू अन् त्याचे शिष्य बैतसयदा ले सोडून कैसरिया फिलीपी शहराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जायाले निगाले, तवा रस्त्यानं जाताजाता, त्यानं शिष्यायले विचारलं, “लोकं माह्या बाऱ्यात काय म्हणतात?” 28शिष्यायनं त्याले उत्तर देलं, “योहान बाप्तिस्मा देणारा, कोणी म्हणते एलिया भविष्यवक्ता अन् कोणी-कोणी असं म्हणते कि भविष्यवक्त्यायतून कोणी तरी एक हाय.” 29तवा येशूनं त्यायले विचारलं, “कि तुमी माह्या बाऱ्यात काय म्हणता?” पतरसन उत्तर देलं तुमी ख्रिस्त हा. 30तवा येशूनं शिष्यायले चिताऊन म्हतलं, “माह्या बद्दल कोणाले सांगू नका.”
आपल्या मरणाच्या विषयात येशूची भविष्यवाणी
(मत्तय 16:21-23; लूका 9:22)
31मंग येशू त्यायले शिकवण देऊ लागला, “माणसाच्या पोराले नक्की हाय की लय दुःख भोगावं, अन् यहुदी पुढारी, मुख्ययाजक व मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक ह्यायच्या पासून नाकारले जावे., अन् जीवानं मारला जावं, अन् तो अन् तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत होईन.” 32ह्या गोष्टी येशू साप-साप बोलू रायला होता, तवा ह्या गोष्टीवर पतरसन येशूले बाजुले नेऊन दटावू लागला. 33तवा येशूनं फिरून आपल्या शिष्यायकडे पायलं अन् पतरसले दाटून म्हतलं, “हे सैताना माह्यापासून निघून जाय, कावून कि तू देवाच्या सारखा नाई पण माणसा सारखा विचार करत हाय.”
येशूच्या मांग चल्याचा अर्थ
(मत्तय 16:24-28; लूका 9:23-27)
34मंग त्यानं आपल्या शिष्यायले व लोकायले बलाऊन म्हतलं, “ज्या कोणाले माह्य अनुकरण कराचं हाय, त्यानं स्वताच्या त्याग करून, आपला वधस्तंभ उचलावा अन् माह्या मांग यावं. 35कावून कि जो कोणी पृथ्वीवर आपला जीव वाचव्याचा प्रयत्न करीन, तो आपला खरं जीवन गमाविन अन् जो कोणी आपला जीव सुवार्थेसाठी देईन, त्याले खरं जीवन मिळेल. 36जर माणसानं आपल्या इच्छा प्रमाण सगळं मिळवलं अन् शेवटी त्यानं आपल्या जीवाले नाश केलं तर काय फायदा होईन? 37अन् माणूस आपल्या जीवाबद्दल काय भरपाई देऊ शकते? 38अन् जो कोणी ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये माह्यी व माह्या वचनाची लाज धरीन, जवा मी माणसाचा पोरगा पवित्र देवदूता संग देवबापाच्या गौरवाने येईन तवा मले पण त्याची लाज वाटीन.”

S'ha seleccionat:

मरकुस 8: VAHNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió