लूक 9
9
बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे
1मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला;
2आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले.
3त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका; अंगरखेही दोन-दोन घेऊ नका.
4ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा.
5जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.”
6मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करत गावोगावी फिरू लागले.
हेरोद घोटाळ्यात पडतो
7तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले; आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक जण म्हणत होते;
8कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते.
9पण हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता.
पाच हजार लोकांना भोजन
10नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला.
11हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता.
12दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.”
13पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.”
14कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.”
15त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले.
16तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.
17तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले, आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.
येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
18नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?”
19त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.”
20त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”
स्वत:चे मरण व पुनरुत्थान ह्यांविषयी येशूचे भविष्य
21मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली;
22आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”
आत्मत्याग करण्यासाठी आमंत्रण
23त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
24जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील.
25कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
26जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वत:च्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
27मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
येशूचे रूपांतर
28ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
29आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले.
30आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते;
31ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते.
32तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले.
33मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक;” हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते.
34तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले.
35तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा (प्रिय) ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’
36ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यांतले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.
भूतग्रस्त मुलगा
37नंतर असे झाले की, दुसर्या दिवशी ते त्या डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला.
38तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरूजी, मी आपल्याला विनंती करतो, माझ्या मुलावर कृपादृष्टी करा; कारण हा माझा एकुलता एक आहे;
39आणि पाहा, कोणीएक आत्मा त्याला धरतो, आणि हा एकाएकी ओरडतो; मग तो ह्याला असा पिळतो की ह्याला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ ठेचतो व ह्याला सोडता सोडत नाही.
40त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.”
41येशूने म्हटले, “अहो विश्वासहीन व कुटिल पिढीचे लोकहो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.”
42तो जवळ येत आहे इतक्यात भुताने त्याला आपटले व पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले; आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले.
43देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले.
येशूचे स्वत:च्या मरणाविषयीचे दुसरे भविष्य
येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
44“तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.”
45ही गोष्ट त्यांना समजली नाही; ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती; आणि ह्या गोष्टीविषयी त्याला विचारायला ते भीत होते.
नम्रता व परमसहिष्णुता
46नंतर आपल्यामध्ये मोठा कोण ह्याविषयी त्यांचा आपसांत वाद सुरू झाला.
47येशूने त्यांच्या अंत:करणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले;
48मग त्याने त्यांना म्हटले, “जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.”
49योहानाने म्हटले, “गुरूजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले; तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हांला अनुसरत नाही.”
50येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका; कारण जो तुम्हांला प्रतिकूल नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”
येशू यरुशलेमेस जाण्यास निघतो; आतिथ्य न करणारे शोमरोनी
51पुढे असे झाले की, त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले.
52त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले; तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले;
53पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख यरुशलेमेकडे जाण्याचा होता.
54हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभूजी, ‘आकाशातून अग्नी पडून’ त्यांचा ‘नाश व्हावा’ म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय?”1
55त्याने वळून त्यांना धमकावले.2
56मग ते दुसर्या गावास गेले.
शिष्य होऊ इच्छिणार्यांची कसोटी
57तेव्हा असे झाले की, ते वाटेने चालत असता कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
58येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.”
59त्याने दुसर्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये;” परंतु तो म्हणाला, “प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या.”
60तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”
61त्यावर आणखी एकाने म्हटले, “प्रभूजी, मी आपल्यामागे येईन; परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या.”
62येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.”
Sélection en cours:
लूक 9: MARVBSI
Surbrillance
Partager
Copier
Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: