1
उत्पत्ती 25:23
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहने तिला सांगितले, “तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील; एकजण दुसर्यापेक्षा बलवान होईल, मोठा लहान्याची सेवा करेल.”
Confronta
Esplora उत्पत्ती 25:23
2
उत्पत्ती 25:30
तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम असेही म्हणतात.)
Esplora उत्पत्ती 25:30
3
उत्पत्ती 25:21
इसहाकाने याहवेहची प्रार्थना करून रिबेकाहला मूल देण्याची विनंती केली, कारण तिला मूल नव्हते. याहवेहने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची पत्नी रिबेकाह गर्भवती झाली.
Esplora उत्पत्ती 25:21
4
उत्पत्ती 25:32-33
एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
Esplora उत्पत्ती 25:32-33
5
उत्पत्ती 25:26
मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
Esplora उत्पत्ती 25:26
6
उत्पत्ती 25:28
इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता.
Esplora उत्पत्ती 25:28
Home
Bibbia
Piani
Video