Logo YouVersion
Icona Cerca

लूक 4:9-12

लूक 4:9-12 MARVBSI

नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल.’ आणि ‘तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’ येशूने त्याला उत्तर दिले की, “‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस’ असे सांगितले आहे.”