मत्तय 9

9
येशु लखवा व्हयेल माणुसले बरा करस
(मार्क २:१-१२; लूक ५:१७-२६)
1तवय येशु नावमा बशीसन आपला पलीकडला शहरमा जाईसन पोहचना. 2मंग दखा, खाटवर पडेल एक लखवा व्हयेल माणुसले त्यानाकडे आणं, तवय येशु त्यासना ईश्वास दखीसन लखवा व्हयेल माणुसले बोलना, पोऱ्या धीर धर; तुना पापसनी क्षमा व्हयेल शे. 3मंग दखा, काही शास्त्री आपला आपलामा बोलनात, “हाऊ चुकीनं बोलस!”
4येशु त्यासना ईचार वळखीसन बोलना, “तुम्हीन आपला मनमा वाईट ईचार का बरं आणतस? 5कारण ‘तुना पापनी क्षमा व्हयेल शे’ अस बोलनं, किंवा ‘ऊठीसन चाल’ अस बोलनं, ह्या मातीन कोणतं सोपं शे? 6कारण मनुष्यना पोऱ्याले पृथ्वीवर पापसनी क्षमा कराना अधिकार शे हाई तुमले समजाले पाहिजे.” म्हणीसन मंग तो लखवा व्हयेल माणुसले बोलना, “ऊठ, तुनी खाट उचलीन घर जाय!”
7मंग तो ऊठीसन आपला घर गया. 8हाई दखीसन लोके घाबरी गयात, अनी ज्या देवनी माणुसले एवढा अधिकार दिधा त्यासनी देवना गौरव करा.
मत्तय नावना माणुसले पाचारण
(मार्क २:१३-१७; लूक ५:२७-३२)
9मंग तठेन जातांना येशुनी मत्तय नावना माणुसले जकात नाकावर बशेल दखं अनी त्याले बोलना, मनामांगे ये; तवय तो ऊठीसन त्यानामांगे गया. 10#लूक १५:१,२नंतर अस व्हयनं की, तो घरमा जेवाले बशेल व्हता, दखा, तवय बराच जकातदार अनं पापी लोके ईसन येशु अनं त्याना शिष्य यासनासंगे पंगतमा जेवाले बठनात. 11हाई दखीसन परूशी त्याना शिष्यसले बोलनात, तुमना गुरू जकातदार अनं पापी लोकससंगे का बरं जेवस? 12हाई ऐकीन येशु त्यासले बोलना, निरोगीसले वैद्यनी गरज नही, तर रोगीसले शे. 13#मत्तय १२:७“माले दया पाहिजे, यज्ञ नको” याना अर्थ काय, हाई जाईन शिका; कारण मी न्यायीसले नही तर पापी लोकसले बलावाकरता येल शे.
उपासना प्रश्न
(मार्क २:१८-२२; लूक ५:३३-३९)
14त्या येळले योहानना शिष्य येशुकडे ईसन त्याले बोलनात, आम्हीन अनं परूशी लोके पुष्कळ उपास करतस पण तुमना शिष्य उपास करतस नही, ह्यानं कारण काय? 15मंग येशु त्यासले बोलना, जोपावत वऱ्हाडीसनासंगे नवरदेव शे तोपावत त्यासले भूक्या राहावाई का? तरी असा दिन येतीन की, नवरदेवले त्यासनापाईन लई जातीन, तवय त्या उपास करतीन. 16कोणी नवा कपडानं ठिगळं जुना कपडाले लावतस नही; कारण चांगलाकरता लायेल ठिगळं त्या जुना कपडाले फाडी टाकस अनं छिद्र मोठं करी टाकस. 17कोणी नवा द्राक्षरस जुना कापडाघाई बनाडेल थैलीमा ठेवतस नही; ठेवा तर थैली फाटीन द्राक्षरस सांडाई जाई अनी थैलीना नाश व्हस; म्हणीसन नवा द्राक्षरस नवा थैलीमा ठेवतस म्हणजे त्या दोन्ही नीट राहतस.
याईरनी पोर अनं रक्तस्रावी बाई
(मार्क ५:२१-४३; लूक ८:४०-५६)
18येशु त्यानासंगे बोली राहींता तवय दखा, एक अधिकारी ईसन त्याना पाया पडीसन बोलना, “मनी पोर इतलामा मरनी, तरी तुम्हीन ईसन तिना डोकावर आपला हात ठेवा म्हणजे ती जिवत व्हई.” 19तवय येशु ऊठना अनं त्याना शिष्यससंगे त्या अधिकारीना मांगे जावाले लागना. 20मंग, दखा बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हयेल एक बाईनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा. 21कारण ती आपला मनमा बोलनी, की मी त्याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसू. 22तवय येशु मांगे वळीसन तिले दखीन बोलना, “बाई, धीर धर! तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे,” अनं ती बाई त्याच घटकाले बरी व्हयनी. 23मंग येशु अधिकारीना घरमा जाईन पावा वाजणारासले अनं शोक करनारा लोकसनी गर्दीले दखीसन बोलना, 24“वाट सोडा, कारण पोर मरेल नही; ती झोपेल शे!” तवय त्या त्यानी टिंगल करू लागनात. 25मंग लोकसले बाहेर काढानंतर त्यानी मझार जाईसन त्या पोरना हातले धरं अनी ती लगेच ऊठनी. 26हाई बातमी देशना त्या प्रांतमा पसरी गयी.
येशु दोन आंधयासले बरं करस
27मंग येशु तठेन जाई राहींता, तवय, दोन आंधया त्यानामांगे जाईसन जोरमा वरडीसन बोलनात, अहो दावीदना पोऱ्या, आमनावर दया कर. 28तो घरमा गया तवय त्या आंधया त्याना जवय वनात; मंग येशु त्यासले बोलना, मी तुमले बरा करू शकस असा तुमना ईश्वास शे का? त्या त्याले बोलनात, हा प्रभु. 29तवय तो त्यासना डोयाले स्पर्श करीसन बोलना, तुमना ईश्वास प्रमाणे तुमले भेटो. 30तवय त्यासले दखावाले लागनं; मंग येशुनी त्यासले बजाडीन सांगं, की, दखा, कोणलेच समजाले नको म्हणीन संभाळा. 31तवय त्यासनी तठेन जाईसन सर्वा देशभर त्यानी किर्ती गाजाडी.
येशु मुका भूत लागेल माणुसले बरा करस
32मंग त्या तठेन जाई राहींतात, दखा, लोके एक मुका भूत लागेल माणुसले त्यानाकडे लई वनात. 33येशुनी ते भूत काढावर तो मुका बोलु लागना; तवय लोकसमुदाय नवल करीसन बोलनात, इस्त्राएलमा अस कधीच दखामा येल नव्हतं; 34#मत्तय १०:२५; १२:२४; मार्क ३:२२; लूक ११:१५पण परूशी बोलनात, हाऊ भूतसना राजानी मदत लिसन भूत काढस.
कामगार थोडाच शेतस
35 # मत्तय ४:२३; मार्क १:३९; लूक ४:४४ मंग येशु त्यासना सभास्थानमा देवराज्यनी सुवार्ता प्रचार गाजाडत, सर्वा कमजोर अनं रोगीसले बरं करत गावेगाव अनं शहरसमा फिरी राहींता. 36#मार्क ६:३४तवय लोक समुदायले दखीसन त्याले त्यासनी किव वनी, कारण त्या बिन मेंढपाळना मेंढरंसना मायक किदरेल अनी भटकेल व्हतात. 37#लूक १०:२मंग तो त्याना शिष्यसले बोलना, पिक बराच शे, पण काम करनारा थोडाच शेतस; 38यामुये पिकना मालकनी कापणी कराले काम करनारासले धाडाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन प्रार्थना करा.

ハイライト

シェア

コピー

None

すべてのデバイスで、ハイライト箇所を保存したいですか? サインアップまたはサインインしてください。