प्रेषितांचे कार्य 4
4
1ते लोकांबरोबर बोलत असता काही याजक, मंदिराच्या रक्षकांचा अधिकारी व सदूकी हे तेथे आले. 2हे लोक संतप्त झाले होते कारण पेत्र व योहान लोकांना शिकवण देऊन, येशूद्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे, असे उघडपणे सांगत होते. 3म्हणून त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवले. 4वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत वाढत गेली.
5दुसऱ्या दिवशी यहुदी अधिकारी, वडीलजन व शास्त्री यरुशलेम नगरात एकत्र जमले. 6त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली. 7ह्या सर्वांनी प्रेषितांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?”
8तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, 9एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल, 10तर तुम्हां सर्वांना व सर्व इस्राएली लोकांना हे समजायला हवे की, ज्याला तुम्ही क्रुसावर चढवून मारले व ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य पूर्णपणे बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. 11तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे. 12तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”
13पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले. 14मात्र बऱ्या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना. 15मग त्यांनी प्रेषितांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगून ते आपसात विचार करून म्हणाले, 16“ह्या माणसांचे आपण काय करावे? त्यांच्याकडून खरोखर असामान्य चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमवासियांना कळून चुकले आहे आणि ते आपणाला नाकारता येत नाही. 17परंतु ही गोष्ट लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद देऊ की, ह्यापुढे लोकांपैकी कोणाबरोबरही तुम्ही येशूच्या नावाने बोलू नये.”
18त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.” 19परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले, “देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. 20कारण जे आम्ही पाहिले व ऐकले त्याविषयी न बोलणे, हे आम्हांला शक्य नाही.” 21त्यांनी त्यांना पुन्हा अधिक कडक ताकीद देऊन सोडून दिले, त्यांना शिक्षा कशी करावी, हे लोकांच्या भयामुळे त्यांना सुचेना. घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते. 22बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसाच्या बाबतीत घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.
श्रद्धावंतांची प्रार्थना
23पेत्र व योहान ह्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले. मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांनी त्यांना जे सांगितले होते ते सर्व त्यांनी त्यांना कथन केले. 24ते ऐकून श्रद्धावंत एकत्रितपणे देवाकडे प्रार्थना करीत म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यांत जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. 25आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले:
राष्ट्रे का खवळली
व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या?
26प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध
पृथ्वीचे राजे उभे राहिले
व अधिकारी जमले.
27कारण ज्याला तू अभिषिक्त केलेस तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरुद्ध ह्या शहरात यहुदीतर लोक व इस्राएली लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे खरोखर एकत्र झाले आहेत. 28जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नियोजित केले होते ते त्यांनी पूर्ण करावे. 29तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा 30आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.”
31त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले.
श्रद्धावंतांची जीवनशैली
32विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते. 33प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; त्या सर्वांवर परमेश्वराची मोठी कृपा होती. 34त्यांच्यातील कोणालाही काही उणे नव्हते कारण जमिनीचे किंवा घराचे जेजे मालक होते, ते आपली मालमत्ता विकत आणि तिचे मोल आणून 35प्रेषितांच्या स्वाधीन करत. त्यानंतर ज्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे ते प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.
36कुप्र बेटावर जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. प्रेषित त्याला बर्णबा म्हणजे उत्तेजनपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती. 37ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.
Šiuo metu pasirinkta:
प्रेषितांचे कार्य 4: MACLBSI
Paryškinti
Dalintis
Kopijuoti
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Flt.png&w=128&q=75)
Norite, kad paryškinimai būtų įrašyti visuose jūsų įrenginiuose? Prisijunkite arba registruokitės
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

:
Paryškinti
Dalintis
Kopijuoti
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)