YouVersion logotips
Meklēt ikonu

लूक 17

17
ठोकर ना कारण बनान
(मत्तय 18:6,7,21,22; मार्क 9:42)
1नंतर तेनी आपला शिष्यस्ले सांग, हय निश्चित शे कि त्या गोष्टी ज्या पाप ना कारण शेत, येतीन, पण तेना साठे कितला भयानक हुईन, त्या माणुस वर जेना व्दारे ठोकर लागस. 2कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन, कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो. 3सावधान राहा कि तुमी काय करतस, कदी तुना भाऊ अपराध करस त तेले धमकाव, आणि कदी पचतावस त तेले माफ कर. 4कदी दिन भर मा तो सात सावा तुना गुन्हा करस, आणि साती सावा तुना जोळे परत ईसन सांगो, कि मी पचतावस, त तेले माफ कर.
विश्वास
5तव प्रेषितस्नी प्रभु येशु ले सांग, आमना विश्वास ले आखो पक्का कर. 6प्रभु येशु नि सांग, कि जर तुमना विश्वास राई ना दाना एवळा बी ऱ्हाता, त तुम्ही या तू तेना झाळ ले सांगतात कि मुय सगट उपळीसन समुद्र मा लागी जा, त तो तुम्हनी मानी लेता.
चांगला दास
7कदी तुम्हना दास वावर मा नागरीसन व मेंढ्यास्ले चारीसन घर येस, त काय तुमी सांगश्यात, लगेच ये आणि जेवण कराले बठ? 8नई, पण तो सांगीन, कि मना जेवण तयार कर, आणि जठ लगून मी खावू-पिवू तठ लगून मनी सेवा करासाठे तयार हुई जा, एना नंतर तू बी खाई-पी लेयजो. 9तुमी आपला दास ले त्या काम ले करासाठे धन्यवाद नई म्हणावत, कि जे तुमी तेले कराले सांगेल होतात. 10ह्याच प्रमाणे, तुमी ते सगळ काही लीयेल राहोत, जे तुमले करासाठे सांगेल होत, त तुमले हय कराले पाहिजे, आमी साधारण दास शेतस, कि जे आमले करन होत तेच करेल शे.
कोळी ना दहा रोगीस्ले बर करान
11जव येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर कळे जानारा रस्ता वर चालीऱ्हायंतात, तो शोमरोन प्रांत आणि गालील जिल्हास्ना मधून जाई ऱ्हायंता. 12आणि कोणता गाव मा धुसाना टाईम वर तेले दहा कोळी भेटनात. 13आणि तेस्नी दूर उभा ऱ्हायसन, जोरमा सांग, ओ येशु, ओ गुरुजी, आमना वर दया कर. 14तेनी तेस्ले देखीसन सांग, “जा, आणि आपला यहुदी पुजारीस्ले दाखाळा,” आणि जातांना त्या शुद्ध हुई ग्यात. 15तव तेस्ना मधून एक हय देखीसन कि मी चांगला हुई जायेल शे, जोरमा परमेश्वर नि स्तुती करत तो येशु जोळे परत उना. 16आणि येशु ना पाय वर पालथा पळीसन, तेले धन्यवाद देवाले लागणा. तो शोमरोन प्रांत ना एक माणुस होता. 17एनावर येशु नि विचार, काय दाहा न दाहा माणस बरा नई हुईनात, त मंग त्या नवू कोठे शेतस? 18काय हवू माणुस दुसरा देश ना ले सोळीसन कोणी आखो नई निघणा, जो परमेश्वर नि स्तुती करता? 19तव येशु नि तेले सांग, “उठीसन चालना जा, तुना विश्वास नि तुले बरा करेल शे.”
परमेश्वर ना राज्य न प्रगट होण
(मत्तय 24:23-28,37-41)
20जव परूशी लोकस्नी येशु ले विचार, कि परमेश्वर ना राज्य कव ईन? त तेनी तेस्ले उत्तर दिधा, कि परमेश्वर ना राज्य ह्या प्रकारे इरायना शे, कि तुमी तेले आपला डोयास कण नई देखू सकाव. 21लोक हई नई सांगाव, कि देखा, आठे व तठे शे. कारण कि, परमेश्वर ना राज्य तुमना मधमा शे. 22आणि तेनी शिष्यस्ले सांग, तो टाईम इरायना, जव तुमी त्या दिन ले देखानी ईच्छा करशात, जव मी, माणुस ना पोऱ्या परत येसू. पण तुमी लोक त्या दिन ले नई देखी सकाव. 23लोक तुमले सांगतीन, देखा, तठे शे व आठे शे, पण तुमी चालना नका जायज्यात आणि नईत तेस्ना मागे चालू लागज्यात. 24कारण कि जशी वीज आकाश ना एक कळून आवाज करीसन आकाश ना दुसरी कळे लोंग चमकस, तसाच माणुस ना पोऱ्या ना दिन बी हुईन. 25पण पहिले निश्चित शे, कि तो गैरा जास्त दुख झेलो, आणि ह्या पिळी ना लोक तेले तुछ्य समजो. 26जस आमना पूर्वज नोहा ना दिनस्मा हुयेल होत, तसच माणुस ना पोऱ्या ना दिनस्मा बी हुईन. 27ज्या दिन लगून नोहा जहाज मा नई चळना, त्या दिन लोंग लोक खात-पीत होतात, आणि तेस्ना मा लग्न-लुग्न होत होतात, तव जलप्रलय नि ईसन त्या सर्वास्ले नष्ट कर. 28आणि त्याच प्रमाणे आमना पूर्वज लोट, जो सदोम शहर मा राहत होता, तेना दिनस्मा हुयेल होत, कि लोक खात-पीत लेन-देन करत, झाळ लावत आणि घर बांधत होतात. 29पण ज्या दिन लोट सदोम मधून निघणा, त्या दिन आग आणि गंधक आकाश मधून पाळणा आणि सर्वा लोकस्ले ज्या शहर मा होतात नष्ट करी टाकना. 30माणुस ना पोऱ्या ना प्रगट होवाना दिनस्मा बी असच हुईन. 31त्या दिन जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, आणि तसच जो वावरस्मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात. 32आठवण करा कि लोट नि बायको ना संगे काय हुयेल होत. 33जो कोणी आपला जीव वाचाळाना देखीन तो तेले दवाळीन, आणि जो कोणी आपला जीव दवाळीन तो तेले जित्ता ठेवीन. 34मी तुमले सांगस, त्या रात ले दोन माणुस एक खाट वर होतीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसराले सोळामा ईन. 35दोन बाया एकत्र दयत होतीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसरी सोळामा ईन. 36दोन झन वावर मा होतीन, एक ले उचलावामा ईन, आणि दुसरा सोळामा ईन. 37हय आयकीसन तेस्नी तेले विचार, “ओ प्रभु, हय कोठे हुईन?” तेनी तेस्ले सांग, “जठे प्रेत शे, तठे गिधळ एकत्र होतीन.”

Pašlaik izvēlēts:

लूक 17: AHRNT

Izceltais

Dalīties

Kopēt

None

Vai vēlies, lai tevis izceltie teksti tiktu saglabāti visās tavās ierīcēs? Reģistrējieties vai pierakstieties