1
रोमकरांस पत्र 14:17-18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत ते आहे. कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 14:17-18
2
रोमकरांस पत्र 14:8
कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 14:8
3
रोमकरांस पत्र 14:19
तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 14:19
4
रोमकरांस पत्र 14:13
ह्याकरता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये; तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 14:13
5
रोमकरांस पत्र 14:11-12
कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे, त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल, व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील.” तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशेब देवाला देईल.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 14:11-12
6
रोमकरांस पत्र 14:1
जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा; पण शंकाकुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 14:1
7
रोमकरांस पत्र 14:4
दुसर्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 14:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ