1
निर्ग. 5:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्ग. 5:1
2
निर्ग. 5:23
मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.”
एक्सप्लोर करा निर्ग. 5:23
3
निर्ग. 5:22
मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस?
एक्सप्लोर करा निर्ग. 5:22
4
निर्ग. 5:2
फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.”
एक्सप्लोर करा निर्ग. 5:2
5
निर्ग. 5:8-9
तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे. तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
एक्सप्लोर करा निर्ग. 5:8-9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ