“पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.
जो इस्राएलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे, त्याचा देव तुम्हासोबत आहे. तुम्ही यहूदातील यरूशलेमास वर जाऊन, जो इस्राएलाचा व यरूशलेमेचा देव, त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे.