यहूद्यांचे वडील बांधणीचे काम करीत राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यामध्ये त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पूर्ण केले.