तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो;
जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही
व दुष्कृत्याकडे पाहत नाही.
तो आपले घर उच्च स्थळी करील;
त्याचे रक्षणाचे स्थान पाषाणाच्या तटबंदीचे दुर्ग असे होतील; त्यांना अन्न व पाण्याचा मुबलक पुरवठा अखंडीत चालू राहील.