1
मार्क 7:21-23
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अपवित्र करतात.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 7:21-23
2
मार्क 7:15
बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अपवित्र करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
एक्सप्लोर करा मार्क 7:15
3
मार्क 7:6
येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
एक्सप्लोर करा मार्क 7:6
4
मार्क 7:7
ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’
एक्सप्लोर करा मार्क 7:7
5
मार्क 7:8
तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.”
एक्सप्लोर करा मार्क 7:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ