इस्राएल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते.
आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही.