म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या! ही योजना किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास ते लयास जाईल, परंतु ते देवाचे असल्यास, तुम्हांला ते नाहीसे करता येणार नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधक ठराल!” न्यायसभेने गमलियेलचे सांगणे मान्य केले.