1
कलस्सैकरांना 2:6-7
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ज्याअर्थी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे त्याअर्थी तुम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करा. त्याच्यामध्ये रुजलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर कृतज्ञता व्यक्त करणारे व्हा.
तुलना करा
एक्सप्लोर करा कलस्सैकरांना 2:6-7
2
कलस्सैकरांना 2:8
ख्रिस्ताकडून नव्हे तर मानवी परंपरांकडून व विश्वावर सत्ता चालविणाऱ्या आत्म्यांकडून येणाऱ्या मानवी शहाणपणाच्या निरर्थक भूलथापांनी तुम्हांला कोणी गुलामगिरीत टाकू नये म्हणून सावध राहा
एक्सप्लोर करा कलस्सैकरांना 2:8
3
कलस्सैकरांना 2:13-14
तुम्ही एके काळी आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेला होता. त्याने आपल्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करून आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले. आपल्याविरुद्ध असलेली ऋणपत्रिका त्याने खोडली व त्याच्या क्रुसावर चढवून त्याने ती पूर्णपणे रद्द केली
एक्सप्लोर करा कलस्सैकरांना 2:13-14
4
कलस्सैकरांना 2:9-10
कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते आणि त्याच्यामध्ये तुम्हांला परिपूर्ण जीवन देण्यात आले आहे. तो सर्व आध्यात्मिक सत्ता व अधिकार यांचा प्रमुख आहे.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांना 2:9-10
5
कलस्सैकरांना 2:16-17
तर मग खाण्यापिण्याविषयी, किंवा सण, किंवा नवचंद्रोत्सव किंवा साबाथ पाळण्याविषयी कोणाला तुमच्यासाठी नियम करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची केवळ छाया आहेत; ख्रिस्त हेच वास्तव आहे.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांना 2:16-17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ