तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.
त्याने म्हटले:
“याहवेह सीयोनातून गर्जना करतात
आणि यरुशलेमातून गडगडाट करतात;
मेंढपाळांची कुरणे सुकून जातात,
आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.”