1
कलस्सैकरांस 2:6-7
मराठी समकालीन आवृत्ती
तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा. त्यांच्यामध्ये मूळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतिने भरून वाहणारे असा.
तुलना करा
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 2:6-7
2
कलस्सैकरांस 2:8
हे लक्षात असू द्या की पोकळ व फसवे तत्वज्ञान जे ख्रिस्तावर नव्हे तर मानवी परंपरा आणि जगीक तत्वांवर आधारित आहे, याद्वारे कोणी तुम्हाला बंधनात पाडू नये म्हणून जपा.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 2:8
3
कलस्सैकरांस 2:13-14
जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली. आपल्याविरुद्ध असलेले व आपणास आरोपी ठरविणारे विधीलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळयांनी ठोकून कायमचे रद्द केले
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 2:13-14
4
कलस्सैकरांस 2:9-10
कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सारी पूर्णता शरीररूपाने राहते; आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण केलेले आहा. ते सर्व सत्ता व अधिकार यांचे मस्तक आहेत.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 2:9-10
5
कलस्सैकरांस 2:16-17
तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका. हे सर्व केवळ येणार्या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते.
एक्सप्लोर करा कलस्सैकरांस 2:16-17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ