राजाकडे जाण्याची एस्तेरची (मर्दखयाने दत्तक घेतलेली, त्याचे काका अबीहाईलच्या कन्याची) पाळी आली, तेव्हा तिने अंतःपुराचा प्रमुख हेगाइचा सल्ला स्वीकारून त्याच्या सूचनेप्रमाणे वस्त्रे परिधान केली आणि ज्यांनीही तिला पाहिले, त्यांची कृपादृष्टी तिच्यावर झाली.