आणि याहवेह मोशे समोरून जाताना घोषणा केली, “याहवेह, याहवेह, दयाळू व कृपाळू परमेश्वर, मंदक्रोध, प्रीती व विश्वासूपण यात उदंड, हजारांवर प्रीती करणारे, दुष्टता, अपराध व पाप यांची क्षमा करणारे; तरीही याहवेह दोषीला निर्दोष असे सोडत नाहीत; तर आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततीवर, व त्यांच्या संततीच्या तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत देणारे आहे.”