हातांसारख्या दिसणार्या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती.