1
उत्पत्ती 37:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:5
2
उत्पत्ती 37:3
इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:3
3
उत्पत्ती 37:4
जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:4
4
उत्पत्ती 37:9
पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:9
5
उत्पत्ती 37:11
या कारणामुळे त्याच्या भावांचा द्वेष अधिक तीव्र झाला; परंतु त्याच्या वडिलांनी ही बाब आपल्या मनात ठेवली.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:11
6
उत्पत्ती 37:6-7
योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझे स्वप्न ऐका: आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेवढ्यात माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या सर्वांच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती गोळा होऊन उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला नमन केले.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:6-7
7
उत्पत्ती 37:20
चला आपण याला ठार करू. त्याला एखाद्या विहिरीत फेकून देऊ आणि आपल्या वडिलांना सांगू की त्याला हिंस्र पशूने खाऊन टाकले आहे; मग त्याच्या स्वप्नांचे काय होते ते आपण पाहू.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:20
8
उत्पत्ती 37:28
मिद्यानी व्यापार्यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:28
9
उत्पत्ती 37:19
ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा स्वप्नदर्शी येत आहे.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:19
10
उत्पत्ती 37:18
त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:18
11
उत्पत्ती 37:22
आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 37:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ