काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!”
योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे. या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.”