1
यशायाह 1:18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशायाह 1:18
2
यशायाह 1:19
जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल
एक्सप्लोर करा यशायाह 1:19
3
यशायाह 1:17
योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा.
एक्सप्लोर करा यशायाह 1:17
4
यशायाह 1:20
परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत.
एक्सप्लोर करा यशायाह 1:20
5
यशायाह 1:16
“धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा.
एक्सप्लोर करा यशायाह 1:16
6
यशायाह 1:15
प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!
एक्सप्लोर करा यशायाह 1:15
7
यशायाह 1:13
अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही.
एक्सप्लोर करा यशायाह 1:13
8
यशायाह 1:3
बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”
एक्सप्लोर करा यशायाह 1:3
9
यशायाह 1:14
तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे.
एक्सप्लोर करा यशायाह 1:14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ